Headline | 6 PM | मुख्यमंत्र्यांनी आम्हाला नेलं असतं तर आनंदच झाला असता : देवेंद्र फडणवीस

Headline | 6 PM | मुख्यमंत्र्यांनी आम्हाला नेलं असतं तर आनंदच झाला असता : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Jun 08, 2021 | 6:52 PM

पंतप्रधानांसोबतच्या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला नेलं असतं तर आनंदच झाला असता, असं मत फडणवीस यांनी यावेळी मांडले. फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी घेतलेली ही भेट Premature होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेलं होतं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. या भेटीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोदी-ठाकरे भेटीचं स्वागत केलं. मोदी आणि ठाकरे यांची व्यक्तिगत भेट झाली की नाही मला माहीत नाही. झाली असेल तर चांगलेच आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. अशा भेटीमुळे राज्याला फायदाच होईल, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कोणतंही शिष्टमंडळ जेव्हा पंतप्रधानांना भेटायलं जातं. तेव्हा शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये एकांतात चर्चा होत असते, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधानांसोबतच्या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला नेलं असतं तर आनंदच झाला असता, असं मत फडणवीस यांनी यावेळी मांडले. फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी घेतलेली ही भेट Premature होती.

Published on: Jun 08, 2021 06:52 PM