Weather Alert: विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवशी मान्सूनचं आगमन होणार

आजपासून विदर्भाच्या बऱ्याच भागात पुर्वमौसमी पावसाची शक्यता आहे. तर 11 तारखेला पूर्व विदर्भात चांगला पाऊस पडेल | Vidharbha Monsoon Rain

Weather Alert: विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 'या' दिवशी मान्सूनचं आगमन होणार
प्रतिकात्मक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 12:05 PM

नागपूर: राज्याच्या अनेक भागांमध्ये दाखल झालेला मान्सून लवकरच विदर्भातही प्रवेश करणार आहे. 12 ते 14 जूनदरम्यान मान्सूनचे (Monsoon) विदर्भात आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या काळात मान्सून गडचिरोली, गोंदिया हा सारा परिसर व्यापेल, असा अंदाज नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहनलाल शाहू यांनी वर्तविला आहे. (IMD prediction about Monsoon rain in Vidarbha region in Maharashtra)

विदर्भातील शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. आजपासून विदर्भाच्या बऱ्याच भागात पुर्वमौसमी पावसाची शक्यता आहे. तर 11 तारखेला पूर्व विदर्भात चांगला पाऊस पडेल, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात, राज्यात पुढचे 4 दिवस धुवाँधार पावसाचा अंदाज

मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस (Mumbai Rains) बरसत आहे. मुंबई उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर या भागात सकाळपासून धुवाँधार पाऊस बरसत आहे. ढगाळ वातावरण आणि बरसणाऱ्या पावसाने परिसरात काळोख दाटला आहे. राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर आता तो जोर पकडणार असल्याचं चिन्हं आहे.

मुंबईसह कोकणकिनारपट्टीवर ढगांनी गर्दी केली आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडमध्ये ढगाळ वातावरण आहे. तर मुंबईच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच हवामान विभागाकडून मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 4 दिवस हे मुंबईसाठी धोक्याचे असणार आहे. या काळात 300 मिलिमीटहून जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबईसह कोकण किनारपट्टीवर ढगांची गर्दी

सध्या मुंबईसह कोकण किनारपट्टीवर ढगांनी गर्दी केली आहे. हवामान शास्रज्ञ के एस होसळीकर यांनी याबाबतचं ट्विटही केलं आहे. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यासह पश्चिम किनारपट्टीवर ढगांची दाटी दिसते आहे. सध्या मध्य महाराष्ट्र ते केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर तुफानी पावसाची परिस्थिती तयार झाली आहे.

पुढच्या 24 तासांत कुठं कसा पाऊस?

पुढच्या 24 तासांत मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यशिवाय मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगरमध्येही तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे.

संबंधित बातम्या 

मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा; यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

(IMD prediction about Monsoon rain in Vidarbha region in Maharashtra)

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.