मुंबई : राज्यात आठवड्याभरापासून थंडीचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. पण आज आणि येत्या 2 दिवसांमध्ये तापमानात किंचित वाढ अपेक्षित असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. नंतर 25 ते 27 जानेवारी दरम्यान पुन्हा उत्तर महाराष्ट्र पट्टयामध्ये तापमान खाली जाण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. यामुळे मुंबई, ठाण्यासह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये थंडी जाणवण्याची शक्यता आहे. (Weather Alert temperature will increase in 2 days in the state but rain is expected on february said by Meteorological Department)
कोरड्या हवामानामुळे राज्यात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळालं. यामुळे किमान तापमानातही घट झाली आहे. अशात उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये वातावरणात वेगाने बदल होताना दिसत आहे. देशात अनेक राज्यांमध्ये तर अद्यापही पाऊस सुरू आहे. राज्यातही फेब्रुवारी महिन्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.
भारतीय हवामान खात्याने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, चार आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार 5 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे. यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याध्ये तुरळक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
२३जानेवारी,
राज्यातले आज किमान तापमानात किंचीत वाढ अपेक्षित येत्या 2 दिवसात, नंतर पुन्हा उत्तर महाराष्ट्र पट्टयामध्ये तापमान खाली जाण्याची शक्यता २५ ते २७ जानेवारी दरम्यान.
मुंबई ठाणे भागात पण हिवाळा जाणवण्याची शक्यता. pic.twitter.com/Xr6Bw9U9hp— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 23, 2021
या अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे शेतीला धोका पोहोचण्याची अधिक शक्यता आहे. सध्या आंबा आणि काजू पिकासाठी वातावरण आहे. मात्र, पाऊस पडला तर या पिकाला मोठा धोका निर्माण होणार आहे. आंबा, भाजीपाला आणि इतर पिकांवर तुडतुडा आणि भुरी रोगाचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेण्याच्या सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. (Weather Alert temperature will increase in 2 days in the state but rain is expected on february said by Meteorological Department)
इतर बातम्या –
Special Story : शेतीपेक्षा मजुरी बरी!, दर तासाला 100 शेतकरी मजूर का होतात?
मायबापाची जबाबदारी टाळली तर थेट 30 टक्के पगार कपात, औरंगाबाद झेडपीचा निर्णय!
(Weather Alert temperature will increase in 2 days in the state but rain is expected on february said by Meteorological Department)