मुंबई: भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागानं पुढील चार दिवसांसाठीचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. अरबी समुद्रातील हवामानाच्या स्थितीमुळं पुढील दोन तीन दिवसात महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात देखील मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. अधिक माहितीसाठी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.
5/11,
महाराष्ट्रात पुढचे 2,3 दिवस काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.
द कोकण,द मध्य महाराष्ट्रात व मराठ वाडा संलग्न भागात ☔?
– IMD pic.twitter.com/0hyRHE9yA3— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 5, 2021
पुढचे 2-3 दिवस राज्यात विजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
5 नोव्हेंबर
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर,अहमदनगर आणि बीड जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आलाय.
6 नोव्हेंबर:
रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली, पुणे, कोल्हापूर,जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
7 नोव्हेंबर
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आलाय.
8 नोव्हेंबरला कोणताही अॅलर्ट जारी केलेला नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली असून ढगांचा जोरदार गडगडाट सुरू आहे. सलग तिस-या दिवशी अवकाळी पावसामुळे ऐन दिवाळीत नागरिकांची तारांबळ उडाली असून भात शेतीचेही मोठ्याप्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. गेले तीन दिवस अचानक पडत असलेल्या पावसामुळे कापणी करून वाळत घातलेल्या भात पिकाचं शेतात पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांच मोठ नुकसान झालं आहे.
इतर बातम्या:
संजय राऊत न्यायाधीश झाल्यासारखं वागतात, प्रसाद लाड यांचा आरोप
Weather Forecast imd predict rainfall in south kokan south Maharashtra and Marathwada within next two three days