Weather Alert : अवकाळी पावसाचं संकट कायम,आयएमडीकडून ॲलर्ट जारी; नंदुरबारमध्ये पारा 7 अंशावर

भारतीय हवामान विभागाच्यावतीनं (IMD) विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध ठिकाणी पुढील तीन दिवसात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट (Weather Alert) होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय.

Weather Alert : अवकाळी पावसाचं संकट कायम,आयएमडीकडून ॲलर्ट जारी; नंदुरबारमध्ये पारा 7 अंशावर
weather (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 8:37 AM

मुंबई : भारतीय हवामान विभागाच्यावतीनं (IMD) विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध ठिकाणी पुढील तीन दिवसात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट (Weather Alert) होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. आयएमडीनं चार दिवसांचे हवामानाचे इशारे जारी केले आहेत. 11 ते 14 जानेवारी दरम्यानचे हवामानाचे इशारे जारी करताना आयएमडीनं विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Unseasonal Rain) होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर, काही ठिकाणी गारपीट होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, दुसरीकडे मराठवाड्यात देखील पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील स्थिती आणि अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागारातील बदल्यात स्थितीचा महाराष्ट्रावर परिणाम दिसून येत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट पसरली आहे. आयएमडीनं विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो ॲलर्ट जारी केला आहे. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे. नंदुरबार जिल्ह्यात तापमान 7 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात थंडीची लाट कायम असल्याचं चित्र आहे.

मराठवाडा विदर्भात पावसाचा अंदाज

उत्तरेकडील पश्चिम विक्षोभ,अरबी समुद्रातून येणारी आर्द्रता व पुढील 4-5 दिवस अरबी व बंगालच्या उपसागरातून एकत्र येणारे वारे यांच्या प्रभावामुळं मध्य भारतात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती. आज विदर्भातील नागपूर वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडयातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात कुठे पाऊस पडणार ?

13 जानेवारी :आयएमडीनं नागपूर, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीला यलो अ‌ॅलर्ट दिला आहे.

नंदुरबारमध्ये पारा 7 अंशांवर

नंदुरबार जिल्ह्यात तापमान 7 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात थंडीची लाट कायम असल्याचं चित्र आहे. तापमान कमी झाल्यानं दुर्गम भागातील जनजीवन विस्कळीत झालंय. मानवी जीवांप्रमाणे मुक्या जनावरांसाठी शेकोट्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात 14 अंश तापमानाची नोंद झालीय.

अकोल्यात तापमान 16 अंशावर

अकोला जिल्ह्यात तापमान 16 अंश सेल्सिअस वर पोहोचलं आहे. यामुळं जिल्हात गारवा कायम असल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या 4 ते 5 दिवसापासून अकोल्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. या बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम होऊन सर्दी,खोकला याने नागरिक त्रस्त आहेत.

इतर बातम्या:

योगी आदित्यनाथ कुठून लढणार? अयोध्या की गोरखपूर? भाजपा फायनल निर्णय घेण्याच्या तयारीत

Sunil Mehta : प्रकाशन व्यवसायात क्रांती करणारे सुनील मेहता काळाच्या पडद्याआड, आज पुण्यात अंत्यसंस्कार

हेही पाहा

Weather Forecast imd predicted unseasonal rain in Marathwada and Vidarbha in two days issue yellow alert

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.