Weather Forecast : कोकण, पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा ते विदर्भात पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात काही ठिकाणी चार ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

Weather Forecast : कोकण, पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा ते विदर्भात पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 7:48 AM

पुणे : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात काही ठिकाणी चार ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. अंदमानच्या समुद्रात गेल्या आठवड्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला आहे.

मुंबई ठाणे परिसरात एक दोन दिवस पाऊस

सर्वत्र किमान तापमानात वाढ होऊन हलकी थंडी गायब झाली आणि आकाश अंशत: ढगाळ वातावरण निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे परिसरात एक-दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दक्षिण कोकणात पाच दिवस पावसाचा अंदाज

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही पाच दिवस पाऊस

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतही पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नंदूरबार, धुळे जिल्ह्यातील काही भागांत पाऊस होईल. मराठवाडय़ातील बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून यलो अ‌ॅलर्ट जारी

18 नोव्हेंबर : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदगर, नाशिक, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

19 नोव्हेंबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

20 नोव्हेंबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदगर, नाशिक, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नंदुरबार, नांदेड जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

21 नोव्हेंबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदगर, नाशिक, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

इतर बातम्या:

कधी नाना पटोलेंचा फोटो असलेल्या कार्यालयावर शरद पवार यांचा फोटो, राष्ट्रवादीच्या विभागीय ऑफिसचं उद्घाटन

NVS : नवोदय विद्यालयात सहावी आणि नववीसाठी प्रवेश घ्यायचाय? प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याचं आवाहन

Weather Forecast imd rains unseasonal rains shower in kokan and western Maharashtra predicted by Pune IMD

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.