पुणे : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात काही ठिकाणी चार ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. अंदमानच्या समुद्रात गेल्या आठवड्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला आहे.
सर्वत्र किमान तापमानात वाढ होऊन हलकी थंडी गायब झाली आणि आकाश अंशत: ढगाळ वातावरण निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे परिसरात एक-दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतही पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नंदूरबार, धुळे जिल्ह्यातील काही भागांत पाऊस होईल. मराठवाडय़ातील बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
17 Nov:
अरबी समुद्रात निर्माण कमी दाबाचे क्षेत्र व संबंधित सिस्टिम मधून कोकण किनारपट्टी मध्ये द्रोणीय स्थिती. परिणामी किनारपट्टी व आतल्या भागात ढगाळ वातावरण. क.दा.क्षे. 48 तासात किनारपट्टी पासून दूर जाऊन अजून दाट होण्याची शक्यता.17-21 Nov राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. pic.twitter.com/erBaLEoKv7
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 17, 2021
हवामान विभागाकडून यलो अॅलर्ट जारी
18 नोव्हेंबर : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदगर, नाशिक, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
19 नोव्हेंबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
20 नोव्हेंबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदगर, नाशिक, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नंदुरबार, नांदेड जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
21 नोव्हेंबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदगर, नाशिक, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
इतर बातम्या:
NVS : नवोदय विद्यालयात सहावी आणि नववीसाठी प्रवेश घ्यायचाय? प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याचं आवाहन
Weather Forecast imd rains unseasonal rains shower in kokan and western Maharashtra predicted by Pune IMD