weather forecast | राज्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज, कुठे, किती ‘वळीव’ बरसणार?
यंदा मान्सून लांबण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (weather forecast rain update) पाऊस यंदा 1 जूनऐवजी 5 जूनला केरळात दाखल होण्याचा अंदाज आहे.
पुणे : यंदा मान्सून लांबण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (weather forecast rain update) पाऊस यंदा 1 जूनऐवजी 5 जूनला केरळात दाखल होण्याचा अंदाज आहे. असं असलं तरी इकडे महाराष्ट्रात ठिकठिकाणी वळवाचा पाऊस बरसत आहे. राज्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. काही ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात तर काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (weather forecast rain update)
राज्यात 15 ते 17 तारखेपर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. तर 18 तारखेला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडे राहील.
तर 19 तारखेला कोकण, गोव्यात, तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. अनेक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तर आज 16 मे रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा आहे.
तर 17 तारखेला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
त्याचबरोबर पुण्यातही पावसाचा अंदाज आहे. 16 आणि 17 तारखेला दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहून मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. तर मुंबई आणि आसपासच्या परिसरात 16 आणि 17 तारखेला आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.
संबंधित बातम्या
Monsoon | महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन लांबण्याची चिन्हं, केरळात 5 जूनला धडकण्याचा अंदाज