Weather report: राज्यात उन्हाचा कडाका वाढणार; विदर्भात 10 मार्चला जोरदार पावसाची शक्यता

हवामान खात्याच्या भाकीतानुसार 10 आणि 11 मार्चला विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. | Weather forecast

Weather report: राज्यात उन्हाचा कडाका वाढणार; विदर्भात 10 मार्चला जोरदार पावसाची शक्यता
दिल्लीकरांना पुढील आठवड्यात करावा लागू शकतो उन्हाचा सामना
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 9:23 AM

पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये उकाडा वाढल्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना आता आणखी त्रासाला सामोरे जावे लागू शकते. कारण, येत्या काही दिवसांत राज्यातील उन्हाचा कडाका (Summer heat) आणखी वाढणार असल्याचे भाकीत पुणे वेधशाळेने वर्तविले आहे. (Temperature will increase in Maharashtra)

तर दुसरीकडे हवामान खात्याने विदर्भात मात्र जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या भाकीतानुसार 10 आणि 11 मार्चला विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर , गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल, असे वेधशाळेने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भातील तापमानाचा पारा 40 अंशापर्यंत जाऊन पोहोचला होता. तर मध्य महाराष्ट्रातही तापमानात किंचित वाढ नोंदवण्यात आली आहे.

चंद्रपुरात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता

महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्या आहेत. विदर्भातील अकोला, चंद्रपूर जिल्ह्यातील उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात यंदा सरासरीपेक्षा तापमान जास्त राहणार असल्याची शक्यता नागपूर हवामान विभागानं वर्तवली आहे. गेल्या आठवड्यात मंगळवारी अकोला जिल्ह्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद करण्यात आली होती. महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णता जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदा मार्च ते मे या काळात दिवसा आणि रात्रीही उष्णता वाढणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

उष्णता वाढीची कारणं काय?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात विदर्भातील अनेक जिल्ह्यातील दिवसा तापमान हे सर्वसामान्य तापमानाच्या तुलनेत 4-6 डिग्री सेल्सिअसने अधिक असेल. तर काही ठिकाणी हे तापमान 40० सेल्सिअसपेक्षा जास्त असू शकतो. अरबी समुद्रात वाहणाऱ्या कोरडे वाऱ्यांमुळे हवेतील आद्रेतेत वाढ झाली आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेचे प्रमाण वाढणार आहे. तसेच मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मार्चचा दुसरा आठवडा हा पहिल्या आठवड्यापेक्षा उष्ण असणार आहे.

संबंधित बातम्या:

Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा, हवामान खात्याचा अंदाज; वाचा आठवडाभराचा वेदर रिपोर्ट

weather update : पावसाच्या तडाख्यानंतर राज्यात कसं आहे हवामान, वाचा आठवडाभराचा वेदर रिपोर्ट

Weather Alert : राज्यासाठी पुढचे तीन महिने धोक्याचे, भयंकर वाढेल उन्हाळा; वाचा वेदर रिपोर्ट

(Temperature will increase in Maharashtra)

वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.