Marathwada Rain | मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी, औरंगाबादसह परभणी, नांदेड, लातूरात जोरदार बॅटिंग, पुढचे दोन दिवस कसे?

भारतीय हवामान खात्याच्या मुंबई येथील प्रादेशिक विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, परभणी, हिंगोली, नांदेड या तीन जिल्ह्यांत 7,8,9 जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Marathwada Rain | मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी, औरंगाबादसह परभणी, नांदेड, लातूरात जोरदार बॅटिंग, पुढचे दोन दिवस कसे?
Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 6:23 PM

औरंगाबादः गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस जुलै महिन्यात तरी सुरु होईल की नाही, या आशेने मराठवाड्यातला (Marathwada)  शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला होता. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यात पावसाला सुरुवात झाली आहे. औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. मात्र पावसाची अपेक्षाच होती. आज 07 जुलै रोजी अखेर संततधार पावसाला सुरुवात झाली. औरंगाबादसह (Aurangabad rain) मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरु आहे. काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मात्र पावसानं अजून एंट्री केलेली नाहीये. औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबादमध्ये (Osmanabad) दुपारपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. बीडमधील काही भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

औरंगाबादेत प्रतीक्षा संपली

औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती. दिवसभर ढगाळ वातावरण आणि हवेत प्रचंड आर्द्रता असं वातावरण होतं. आज गुरुवारी शहर आणि परिसरात संततधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे गर्मीमुळे हैराण असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. तर पेरणीसाठी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांनाही हा पाऊस सुखावणारा ठरला.

नांदेडमध्ये दमदार बॅटिंग

नांदेडमध्ये आज पावसाचे दमदार आगमन झालं. जिल्ह्यात बहुतांश जागी आज पाऊस जोरदारपणे बरसलाय. आजच्या या पावसामुळे वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला. तर या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला . आता या पावसानंतर यापुढे खरीप हंगामाच्या कामाची शेतकऱ्यांची लगाबग वाढलेली दिसणार आहे.

बीड अजून तहानलेलाच

मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार बॅटिंग सुरू असली तरी मराठवाड्यातील बीड जिल्ह्याला अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर आज दुपारनंतर माजलगाव तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. माजलगाव, दिंद्रुड, वडवणी यासह परिसरात समाधानकारक पाऊस झालाय. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. तर अनेक ठिकाणी आजही म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. बहुतांश ठिकाणी लवकर पेरण्या केल्याने या भागात दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. तर आजही अनेक भागातील पेरण्या कोळंबल्यात, त्यामुळे बीड जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

पुढील दोन दिवसाचा अंदाज काय?

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे ग्रामीण कृषी मौसम सेवा प्रकल्पाचे प्रमुख डॉ. के के डाखोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. 08 जुलै रोजी लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात तर 09 जुलै रोजी परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?

भारतीय हवामान खात्याच्या मुंबई येथील प्रादेशिक विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, परभणी, हिंगोली, नांदेड या तीन जिल्ह्यांत 7,8,9 जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर लातूर जिल्ह्यात 8 जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बीड, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात साधारण स्वरुपाचा होईल, असे चित्र आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.