ना बँडबाजा, ना जेवणाच्या पंगती, यवतमाळमध्ये अवघ्या 135 रुपयात शुभमंगल सावधान!

ना बँडबाजा, ना जेवणाच्या पंगती, यवतमाळमध्ये अवघ्या 135 रुपयात विवाह सोहळा पार पडला. Wedding ceremony in Yavatmal

ना बँडबाजा, ना जेवणाच्या पंगती, यवतमाळमध्ये अवघ्या 135 रुपयात शुभमंगल सावधान!
यवतमाळमधील अनोखं लग्न
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 12:03 PM

यवतमाळ : विवाह सोहळा म्हटलं की, लाखोंचा खर्च, पाहुणे, बँड बाजा, जेवणावळी आल्याच. यामध्ये दोन्ही बाजूची मंडळी खर्च करतात. मात्र, ना बँड, ना बारात, ना जेवणावळी… यवतमाळमध्ये अवघ्या 135 रुपयात विवाह सोहळा पार पडला. जिल्ह्यात याच अनोख्या विवाहाची चर्चा पाहायला मिळतीय. हा अनोखा विवाह सोहळा यवतमाळमध्ये नोंदणी पद्धतीने पार पडला.  (Wedding ceremony in Yavatmal for just Rs 135)

साध्या पद्धतीने विवाह सोहळा

वधू मंगला संजय श्रीरामजिकर ही यवतमाळ तालुक्यात येणाऱ्या अकोला बाजार कामठवाडा येथील रहिवासी आहे तर वर राजेश बोरकर अमरावती येथील दस्तुरनगर येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे दोघेही मूक बधिर आहेत. नातेवाईकांनी पुढाकार घेऊन हा विवाह प्रसंग जुळवून आणला.

विवाह सोहळ्याला मोठ्या प्रमाणात नातेवाईकांना न बोलावता मुलाकडील आई वडील, काका, काकू आणि मुलीकडील आई वडील, बहीण, भाऊ एवढीच मोजकी मंडळी उपस्थित होती.

सर्व नातेवाईक नोंदणी कार्यालयात आले आणि केवळ135 रुपये खर्च करून आयुष्यभराच्या गाठी बांधल्या गेल्या. विवाह सोहळ्यात लाखो रुपयांचा खर्च न करता साध्या पध्दतीने कार्यक्रम पार पडू शकतो हे बोरकर आणि श्रीरामजीकर परिवाराने दाखवून दिले आहे.

यवतमाळमध्ये 135 रुपयांत लग्नाची चर्चा

कोरोना संसर्गाच्या काळात कमी लोकांमध्ये विवाह सोहळे साजरे करण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. या लग्नसोहळ्यातही कोरोनाचे सगळे नियम पाळून हा सोहळा संपन्न झाला. सगळ्या यवतमाळ जिल्ह्यात फक्त 135 रुपयांत लग्न, याचीच चर्चा होती.

(Wedding ceremony in Yavatmal for just Rs 135)

हे ही वाचा :

लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या मीशाला तीन वर्षाचा तुरुंगवास, तर पाकिस्तानी गायक अली जफरला दिलासा !

अमरावतीत शिवसेनेचा चक्क एमआयएमला पाठिंबा; नव्या भूमिकेने खळबळ!

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.