नवरात्रीपूर्वीच ममतांनी असं काय केलं? सोशल मीडियावर चौफेर टीका

Kolkata Durga Puja 2022: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अमावस्येपूर्वी तीन दिवस आधी म्हणजे पितृपक्षातच कोलकत्यातील पूजा मंडपांचे उद्घाटन सुरु केलंय. त्यामुळे विरोधकांकडून चहुबाजूंनी टीका होतेय.

नवरात्रीपूर्वीच ममतांनी असं काय केलं? सोशल मीडियावर चौफेर टीका
श्रीभूमी येथील दूर्गा पूजेचं उद्घाटन करताना ममता बॅनर्जी Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: Sep 23, 2022 | 11:11 AM

कोलकताः पश्चिम बंगालमधील (West Bengal) नवरात्रीचा (Navratri) सण अवघ्या देशासाठी लक्षवेधी ठरत असतो. मात्र सध्या इथे नवीनच वाद सुरु झालाय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी महालय अर्थात पितृपक्षातील अमावस्येपूर्वीच दुर्गा पूजेच्या मंडपांचं उद्घाटन सुरु केलंय. बंगालमधील प्रथेनुसार पितृपक्षात दुर्गा पूजा मंडपात पूजा किंवा तेथे जाऊन उद्घाटन करणं टाळलं जातं. त्यामुळे सोशल मीडियावर ममत बॅनर्जींवर चहुबाजूंनी टीका होतेय. बंगालच्या राजकीय वर्तुळात गुरुवारपासून हीच चर्चा आहे.

गुरुवारी ममता बॅनर्जी यांनी श्रीभूमी, साल्टलेट एफडी ब्लॉक आणि टाला पाडा येथील दुर्गा मंडळाचं उद्घाटन केलं. त्यामुळे विरोधकांनी जोरदार टीका सुरु केली आहे.

बंगालमधील आणि एकूणच हिंदु धर्मातील प्रथेनुसार, महालयापूर्वीच अशा प्रकारे पूजा मंडळांचं उद्घटन योग्य नाही, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

श्रीभूमी येथील मंडपाचं उद्घाटन करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, देवीला अद्याप आभूषणं घातलेली नाहीत. त्यामुळे मला माफ कर…’

विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी ट्विट केलं, मुख्यमंत्र्यांनी पितृपक्षातच दुर्गा पूजेचं उद्घाटन केलं. या काळात पूर्वजांना तर्पण केलं जातं. त्यांच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते. या काळात कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. त्यांनी एकट्यानेच सर्व बंगालींना संपवण्याचा निर्णय घेतलाय… ‘

तर ज्येष्ठ काँग्रेस खासदार प्रदीप भट्टाचार्य यांनी म्हटलं, ‘ पितृपक्ष म्हणजे प्रेतपक्ष असतो. याकाळात दूर्गा पूजेचं उद्घाटन कसं होऊ शकतं? मुख्यमंत्री आपली ताकद वापरून काहीही करू शकतात. पण पूजा करायची असेल तर शास्त्रातील नियमांचं पालन करावंच लागेल..’

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.