Western Maharashtra Election Result 2024 Highlights Updates : बारामतीचा निकाल जाहीर; कोणत्या दादांना बारामतीकरांची पसंती?
Western Maharashtra MLA Vidhan Sabha Election Result 2024 Highlights Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आज निकाल... 288 जागांवर झालेल्या मतदानाचा आज अखेर निकाल लागणार आहे. महाराष्ट्राची सत्ता पुढची पाच वर्षे कुणाकडे जाणार हे आज स्पष्ट होणार आहे. वाचा...
महाराष्ट्र विधानसभेचा निकाल आज लागतो आहे. काहीच वेळात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 288 जागासाठी आज मतमोजणी होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात यंदा महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळाला. अटीतटीची लढत यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. राज्यात कुणाचं सरकार येणार? कोणता पक्ष यंदाच्या निवडणुकीत आघाडी घेणार? याबाबतचे सर्व अपडेट्स… आज दिवसभर विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे सर्व अपडेट्स सुपरफास्ट पद्धतीने तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघाच्या मतमोजणीचे सर्व अपडेट्स या ब्लॉगमध्ये तुम्हाला वाचायला मिळणार आहेत. त्यामुळे आमचा लाईव्ह ब्लॉग दिवसभर फॉलो करा….
LIVE NEWS & UPDATES
-
फलटण विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीकडे लक्ष
साताऱ्यातील फलटण विधानसभा मतदारसंघ 25 वी फेरी
1)दिपक चव्हाण (शरद पवारगट ) 4326
2)सचिन पाटील (अजित पवारगट ) 4423
एकूण 17895 मतांनी सचिन पाटील आघाडी
-
विश्वजीत कदम विजयी
पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार विश्वजीत कदम विजयी झाले आहेत. सलग तिसऱ्यांदा विश्वजीत कदम यांनी विजय मिळवला आहे. 28 हजार मताधिक्य घेऊन विश्वजीत कदम यांनी विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार संग्राम सिंह देशमुख यांचा पराभव केला आहे.
-
-
पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव
कराड दक्षिण मतदारसंघातून महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाले आहे. डॉ. अतुल भोसले यांचा 38366 मतांनी दणदणीत विजय झाला आहे. अतुल भोसले विजयी झाले आहेत.
-
भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे पराभवाच्या छायेत
पुण्यातील काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे पराभवाच्या छायेत आहेत. महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार शंकर मांडेकर यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शंकर मांडेकर यांच्या विजयाची अधिकृत घोषणा बाकी आहे. 20 व्या फेरीतही संग्राम थोपटे 29 हजार 867 मतांनी पिछाडीवर आहे.
-
Baramati Election 2024 :बारामतीचा निकाल काय?
बारामतीमधील काका विरूद्ध पुतण्या लढाईत काकांचा विजय झालेला आहे. अजित पवार यांचा विजय झालेला आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युगेंद्र पवार यांचा पराभव झालेला आहे.
-
-
कागल विधानसभा मतदारसंघाचा निकाल काय?
कागल विधानसभा मतदारसंघाचा निकाल आता लागलेला आहे. हसन मुश्रीफ यांचा विजय झालेला आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार समरजित घाटगे यांचा पराभव झालेला आहे.
-
पुण्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील निकाल
पुण्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील निकाल समोर… राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील यांचा विजय झाला आहे.
दिलीप वळसे पाटील – 106095+759+34
देवदत्त जयवंतराव निकम – 104434+892+39
देवदत्त शिवाजीराव निकम – 2955
दिलीप वळसे पाटील 1523 मतांनी विजयी
-
भोर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीचे अपडेट्स
तेराव्या फेरीनंतरही भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे संग्राम थोपटे पिछाडीवरचं आहेत. भोर विधानसभा मतदारसंघांमध्ये तेराव्या फेरीनंतर काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे 45 हजार 551मतांनी पिछाडीवर आहेत. महायुतीचे राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर 45 हजार 551 मतांनी आघाडीवर आहेत. तेराव्या फेरीनंतर एकूण 93 हजार 133 मतदान घेत मांडेकर आघाडीवर आहेत. तर संग्राम थोपटे यांना दहाव्या फेरी अखेर एकूण 47 हजार 582 मत मिळाली आहेत.
-
आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील निकाल काय?
आंबेगाव विधानसभा मतदार संघात अजित दादा गटाचे दिलीप वळसे पाटील 1100 पेक्षा जास्त मताधिक्याने पुढे आहेत.
-
सोलापूर जिल्ह्यातील निकाल काय?
सोलापूर जिल्हा आघाडी पिछाडी :
भाजप – 5
शिवसेना शिंदे गट – 0
राष्ट्रवादी – AP गट – 0
महाविकास आघाडी –
काँग्रेस – 1
राष्ट्रवादी SP गट – 3
शिवसेना ठाकरे गट – 1
अपक्ष :
MIM – 0
शेकाप – 1
अपक्ष – 0
-
सतेज पाटलांना मोठा धक्का…
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. सतेज पाटलांचे पुतणे ऋतुराज पाटील हे पराभवाच्या छायेत आहेत.
-
हडपसरमध्ये कोण आघाडीवर?
हडपसरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चेतन तुपे २५१७६ मतांनी आघाडीवर आहेत.
-
शिवेंद्रराजे भोसले यांच्या विजयाची मिरवणूक
सातारा जावळीचे भाजपचे उमेदवार आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची विजयी मिरवणूक सुरु आहे. कार्यकर्त्यांच्या बरोबर आमदार शिवेंद्रराजे भोसले डॉल्बीच्या गाण्यावर थिरकलेत. सातारा विधानसभा शिवेंद्रराजे भोसले यांचं 18 व्या फेरी अखेर 1 लाख 3 हजार मताधिक्य आहे. 103000 मतांचे लीड आहे.
-
Madha Election Results 2024 :
माढा विधानसभा मतदारसंघात १८ व्या फेरी अखेर शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत पाटील १३ हजार ७१५ मते घेऊन आघाडीवर आहेत. अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे पराभवाच्या दिशेने आहेत.
-
Mohol Election Results 2024 : मोहोळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जल्लोष
सोलापूरमधील मोहोळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू आहे. राजू खरे यांना 14027 मतांची आघाडी घेतल्याने जल्लोष आहे. मोहोळमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे यशवंत माने पिछाडीवर आहेत.
-
Karmala Election Results 2024 : करमाळा विधानसभा मतदारसंघातील स्थिती काय?
करमाळा विधानसभा मतदारसंघात अकरावी फेरीअखेर मतांची आकडेवारी
नारायण पाटील ( महाविकास आघाडी ) – 45254
दिग्विजय बागल ( महायुती ) – 24135
संजयमामा शिंदे – 25551
अकरावी फेरीअखेर
महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील मतांनी 19703 आघाडीवर*
-
Karad South Election Results 2024 LIVE Counting : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीचे अपडेट्स
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात अत्यंत धक्कादायक निकाल…. सहावी फेरी अतुल भोसले 7831 मतांनी आघाडीवर आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पिछाडीवर आहेत.
-
Barshi Vidhan Sabha Election Results 2024 Counting Updates : बार्शी मतदारसंघात कुणाची आघाडी?
सोलापूरच्या बार्शी विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र राऊत यांची आघाडी कायम आहे. शिंदे गटाचे राजेंद्र राऊत 522 मतांनी आघाडीवर आहेत.
-
Mohol Vidhan Sabha Election Results 2024 : मोहोळ विधानसभेत काय घडतंय?
सोलापूरमधील मोहोळ विधानसभेत पुन्हा एकदा ट्विस्ट आला आहे. अजित पवार गटाचे यशवंत माने पिछाडीवर आहेत. तर शरद पवार गटाचे राजू खरे यांना 5062 मतांची आघाडी आहेत.
-
Bhor Vidhan Sabha Election Results 2024 : भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे संग्राम थोपटे पिछाडीवर
भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे संग्राम थोपटे पिछाडीवर आहेत.भोर विधानसभा मतदारसंघांमध्ये चौथ्या फेरीनंतर काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे 22 हजार 454 मतांनी पिछाडीवर आहेत. महायुतीचे राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर 22 हजार 454 मतांनी आघाडीवर आहेत. चौथ्या फेरीनंतर एकूण 35 हजार 446 मतदान घेत मांडेकर आघाडीवर आहे. तर संग्राम थोपटे यांना चौथ्या फेरी अखेर 12 हजार 992 मतं मिळाली आहेत.
शंकर मांडेकर 35446
संग्राम थोपटे 12992
अनिल जगताप 342
लक्ष्मण कुंभार 99
कुलदीप कोंडे 401
किरण दगडे 3841
नोटा 665
एकूण 53786
-
Ambegaon Vidhan Sabha Election Results 2024 Counting Updates : आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीचे अपडेट्स
पुण्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघात नवव्या फेरी अखेर महायुती आघाडीवर आहे. दिलीप वळसे पाटील 2814 मतांनी आघाडीवर आहेत.
-
Sangali Vidhan Sabha Election Results 2024 : सुधीर गाडगीळ यांना मताधिक्य
सांगली विधानसभामधून भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांना मताधिक्य मिळाल्याने सांगली भाजपने जल्लोष सुरू केला आहे. सांगलीतील सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषाला सुरुवात केली आहे.
-
Vidhan Sabha Election Result 2024 LIVE Updates : इस्लामपूर मतदारसंघात कुणाची आघाडी?
सांगलीतील इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील सहाव्या फेरी अखेर 1 हजार 728 मतांनी आघाडीवर आहेत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निशिकांत पाटील पिछाडीवर आहेत.
-
Sangali Vidhan Sabha Election Result 2024 LIVE Updates : सांगलीच्या मतमोजणीचे अपडेट्स
सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा निवडणुकीच्या आताची अपडेट समोर आली आहे. तासगावमधून रोहित पाटील आघाडीवर आहेत. इस्लामपूरमधून जयंत पाटील आघाडीवर, शिराळामधून मानसिंगराव नाईक आघाडीवर, पलूस कडेगावमधून विश्वजीत कदम आघाडीवर आहेत. जतमधून गोपीचंद पडळकर आघाडीवर आहेत. खानापूर मधून सुहास बाबर आघाडीवर आहेत. सांगलीमधून सुधीर गाडगीळ आघाडीवर आहेत. मिरजमधून सुरेश खाडे आघाडीवर आघाडीवर आहेत.
-
Mawal Election Result 2024 LIVE Updates : सुनील शेळके आघाडीवर
मावळ विधानसभा मतदारसंघात सहाव्या फेरी अखेर सुनील शेळके 25,350 मतांनी आघाडीवर आहेत. सुनील शेळके यांना 39,684 मतं मिळाली आहेत. बापू भेगडे यांना 14,334 मतं मिळाला आहेत.
-
Bhor Vidhan Sabha Election Result 2024 : संग्राम थोपटे पिछाडीवर
भोर विधानसभा मतदारसंघातून पहिल्या फेरीमध्ये मविआचे काँग्रेसचे संग्राम थोपटे 4 हजार 815 मतांनी पिछाडीवर आहेत. संग्राम थोपटे यांना पहिल्या फेरीमध्ये 3290 मतं आहेत. महायुतीचे राष्ट्रवादीचे उमेदवार शंकर मांडेकर यांची पहिल्या फेरीत 8 हजार 105 मतं घेऊन आघाडी आहेत.
-
Baramati Election Result 2024 LIVE Updates : बारामतीच्या मतमोजणीला सुरुवात
बारामतीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पोस्टल मतांमध्ये युगेंद्र पवार आघाडीवर होते. तर ईव्हीएमच्या मतमोजणीत अजित पवार आघाडीवर आहेत. तिसऱ्या फेरीत अजित पवार आघाडीवर आहेत.
-
Islampur Assembly Election Result 2024 : जयंत पाटील आघाडीवर
टपाली मतांमध्ये इस्लामपूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील आघाडीवर आहेत.
-
Baramati Vidhan Sabha Election Results 2024 : युगेंद्र पवारांची आघाडी कायम
बारामतीत अजित पवारांना धक्का… बारामतीतील पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये तिसऱ्या फेरीत देखील युगेंद्र पवारांची आघाडी कायम आहे.
-
Mohol Election Result 2024 LIVE Updates : मोहोळमध्ये कुणाची आघाडी?
मोहोळमध्ये पोस्टल मतमोजणीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे यशवंत माने आघाडीवर आहेत.
-
Indapur Election Results 2024 LIVE : हर्षवर्धन पाटील आघाडीवर
इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणेंना धक्का… शरद पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील आघाडीवर
-
Baramati Election Results 2024 LIVE : अजित पवारांना धक्का…
बारामतीत पोस्टल मतांची मोजणी सुरु झाली आहे. अजित पवारांना धक्का… शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार आघाडीवर
-
Satara Election Result 2024 LIVE Updates : कुणाची आघाडी?
सातारा शहर मतदारसंघात भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर आहेत. ठाकरे गटाचे अमित कदम आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात सामना होतोय.
-
Solapur North Election Results 2024 LIVE : सोलापूर विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजपचे विजयकुमार देशमुख विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महेश कोठे यांच्यात लढत होत आहे.
-
Khadwasala Election Results 2024 LIVE : खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या निकालाचे अपडेट्स
खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सचिन दोडके यांनी सर्व व्हीव्हीपॅट स्लिप मोजण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज केलाय.
-
Karad South Vidhan Sabha Election Results 2024 : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात कोण जिंकणार?
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी मतमोजणी केंद्रात कर्मचारी दाखल कराडच्या शासकीय धान्य गोदामात हr मतमोजणी होत आहे. एकूण 33 टेबलवर 300 कर्मचाऱ्यांद्वारे 17 फेऱ्यात ही मोजणी पार पडणार आहे. 18 व्या फेरीला फायनल निकाल येईल. कराड दक्षिण विधानसभा विधानसभेसाठी दोन लाख 40 हजार 743 इतकं मतदान झालं आहे. दुपारपर्यंत निकाल अपेक्षित आहे.
-
khadakwasla Vidhan Sabha Election Results 2024: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार- दोडके
शरद पवार गट उमेदवार सचिन दोडके यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल. दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. गुलाल आम्हीच उधळणार कारण कार्यकर्त्यांनी काम केलं आहे. शरद पवार गटाचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील, असं दोडके म्हणालेत.
-
Ichalkaranji Election Result 2024 LIVE : मतमोजणीला सुरुवात होणार
इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले, विधानसभा मतदारसंघांमध्ये थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी केंद्रावर मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
-
Solapur Election Results 2024 : थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात
सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक मतमोजणीची विशेष तयारी करण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघात फेरीनिहाय आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील 184 उमेदवारांचे भविष्य आज ठरणार आहे. जिल्ह्यातील मतमोजणी केंद्राच्या बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मातब्बर उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बार्शी, सोलापूर शहर मध्य, सोलापूर उत्तर या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत सविस्तर निकाल लागण्याची शक्यता आहे.
Published On - Nov 23,2024 7:30 AM