मुलीने उपवास केला तर चांगला मुलगा मिळतो पण मुलांनी… आमदार गोपीचंद पडळकर याचं नेमकं विधान काय?
आम्ही पोस्टमन आहोत तुमचा मागणी घ्यायची आणि वर पोहचती करायची, आम्ही आज तुमचे भाऊ म्हणून आलो होतो, काही लोकांना प्रश्न सुटू नेये असेच वाटत होते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या दुकानाला मोठे कुलूप लावलं आहे.
पुणे : मुलीने जर सोमवारचा उपवास केला तर तिला चांगला मुलगा मिळतो पण तुम्ही उपवास करून काहीच फायदा नाही, तुम्हाला एमपीएससी मध्ये पास व्हावं लागेल, तेव्हाच तुम्हाला मुलगी मिळेल असं विधान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हंटलं आहे. पुण्यात आज एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या नवा पॅटर्न 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी अलका टॉकीज चौकात आंदोलन सुरू केले होते. यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली होती. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्यासह विद्यार्थ्यानी आंदोलकांनी जल्लोष साजरा केला. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी तूफान भाषण केलं आहे.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, ज्यांनी प्रश्न निर्माण केला तीच लोकं प्रश्न सोडवणूक करण्याचा प्रयत्न करत होते, या पोरांनी त्यानं बरोबर खुट्ट्या घातल्या आहेत.
आंदोलन केलं त्यावेळी आम्ही सांगत होतो की केसेस आमच्यावर लावा विद्यार्थ्यावर नको, हा निर्णय फडणविस साहेब आणि शिंदे साहेबांच्या कॅबिनेट ने घेतला आहे.
आम्ही पोस्टमन आहोत तुमचा मागणी घ्यायची आणि वर पोहचती करायची, आम्ही आज तुमचे भाऊ म्हणून आलो होतो, काही लोकांना प्रश्न सुटू नेये असेच वाटत होते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या दुकानाला मोठे कुलूप लावलं आहे.
तुम्ही फक्त आमच्या नावाने शिमगा केला तुमच सरकार आले तेंव्हा तुम्हीं काहीच नाही केल. सरकारने गेल्या ६ महीन्यात लोकांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत.
तुमचा निरोप डीसीएम कडे दिला, त्यांचा फोन आला आणि कॅबिनेट मध्ये निर्णय झाला. तुम्हीं आजचा दिवस बरोबर निवडला आंदोलनासाठी, तुम्हाला कळून चुकले की आंदोलन कधी आणि कुठे आणि कसं करायचं आणि कुणाला बोलवायचं त्यामुळे तुम्ही यशस्वी झाला.
तुम्ही केव्हाही आवाज द्याल तिथे आम्ही ओ म्हणणार, आम्ही फाटकी माणस आहोत आम्हाला कशाला टीव्हीवर दिसायचं आहे. आम्ही अनेक विषयावर आंदोलनं केलं, आणि यशस्वी करुन दाखवलं आहे असं पडळकर यांनी म्हंटलं आहे.
गोपीचंद पदळकर यांनी भाषणादरम्यान रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल करत आंदोलन केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून अभिनंदन केले आहे.