शेवटी सत्यजितला ठरवायचं आहे, पण माझा सत्यजितला सल्ला आहे, अजित पवार यांनी सत्यजित तांबे यांना दिलेला सल्ला काय?

सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर येत्या 04 फेब्रुवारीला भूमिका जाहीर करणार आहे. मात्र त्यापूर्वी अजित पवार यांनी सत्यजित तांबे यांना सल्ला दिला आहे.

शेवटी सत्यजितला ठरवायचं आहे, पण माझा सत्यजितला सल्ला आहे, अजित पवार यांनी सत्यजित तांबे यांना दिलेला सल्ला काय?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 12:53 PM

पुणे : नवनिर्वाचित अपक्ष आमदार सत्यजित तांबे ( Satyajit Tambe ) यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सत्यजित तांबे यांना स्थानिक पातळीवर निवडणूक भाजपने पाठिंबा दिल्यानं सत्यजित तांबे हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोललं जाऊ लागलं आहे. त्यातच कॉंग्रेसने सुधीर तांबे ( Sudhir Tambe ) यांच्यासह सत्यजित तांबे यांना निलंबित केले आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांची भूमिका काय असणार या प्रश्नांची उत्तरे 04 फेब्रुवारीला मिळणार आहे. सत्यजित तांबे पत्रकार परिषद घेऊन याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. नाना पटोले यांनी केलेल्या आरोपांवरही सत्यजित तांबे बोलणार असले तरी दुसरिकडे अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी सत्यजित तांबे यांना सल्ला दिला आहे.

सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीत बाजी मारली आहे. सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात लढत पाहायला मिळाली आहे. मात्र, त्याच वेळी सत्यजित तांबे भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहे.

सत्यजित तांबे यांनी भाजपकडे पाठिंबा मागणार असल्याचीही भूमिका घेतली होती, त्यावर नंतरच्या काळात तांबे यांनी बोलणं टाळलं होतं, त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.

हे सुद्धा वाचा

याच दरम्यान अजित पवार यांनी सत्यजित तांबे यांना सल्ला दिला आहे. सत्यजित यांच्या उमेदवारी स्वतः शरद पवार यांनी पुढाकार घेतल्याचे अजित पवार यांच्या बोलण्यातून दिसून आले आहे.

सत्यजीतला उमेदवारी दया असं स्वत: पवार साहेबांनी मल्लिकार्जून खरगेंना फोन करून सांगितलं होतं. पण त्यांनी त्यांच्या वडिलांना उमेदवारी दिली आणि तिथंच गडबड झाली असे अजित पवार म्हणाले आहे.

असो आताही काँग्रेसनं फार ताणून धरू नये, आणि सत्यजितला पुन्हा सोबत घ्यावं असं मला वाटतं पण अंतिम निर्णय हा सत्यजितनेच घ्यायचा आहे असेही अजित पवार यांनी म्हंटलं आहे.

सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात आणि वडील सुधीर तांबे हे कॉंग्रेसच्या विचारांचे आहे, त्यामुळे सत्यजित तांबे हे थोरामोठ्याचे ऐकतील असं वाटतं असेही मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

तर दुसरीकडे सत्यजित तांबे यांना भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकूळे यांनी भाजपामध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे.

त्यामुळे 04 फेब्रुवारीला सत्यजित तांबे भाजपची ऑफर स्वीकारनार का? अजित पवार यांचा सल्ला स्वीकारनार की वडिलांनी दिलेला अपक्ष राहण्याचा सल्ला स्वीकारतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.