अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील महत्त्वाचे ठराव कोणते?; मराठी शाळांचे इंग्रजी माध्यमाच्या…

पुस्तकांच्या किमती नियंत्रित करण्यासाठी प्रकाशकांना छपाई आणि कागद खर्चात सबसिडी देण्यात यावी. तसेच, त्यांना जीएसटीमधून वगळण्यात यावे, यासाठी प्रयत्न करावा.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील महत्त्वाचे ठराव कोणते?; मराठी शाळांचे इंग्रजी माध्यमाच्या...
मराठी साहित्य संमेलन
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 8:35 PM

वर्धा : 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात (All India Marathi Sahitya Sanmelan) महत्त्वाचे दहा ठराव घेण्यात आले. या ठरावांनी संमेलनाची सांगता झाली. 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर साहित्य, नाट्य, राजकारण, सामाजिक क्षेत्रातील ज्या दिग्गज व्यक्तींचे निधन झाले. त्यांच्या स्मृतींना वंदन करून हे 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्‍यांच्या श्रद्धांजलीचा ठराव मांडण्यात आला. ठराव क्रमांक 2 नुसार, विदर्भ साहित्य संघाचे अर्ध्वयू ज्‍यांनी हे संमेलन घेण्याचा प्रस्ताव मांडला होता, ते कै. मनोहर म्हैसाळकर (Manohar Mhaisalkar) यांच्या निधनाबद्दल हा विशेष दुखवट्याचा ठराव हा मांडण्यात आला.

ठराव क्रमांक 3 :

राज्यातील ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत एकसूत्रीकरण असावे. त्यांना किमान वेतन कायदा सक्‍तीचा करावा, अशी मागणी हे 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या ठरावाद्वारे करत असल्याचं सूचक अशोक बेंडखळे यांनी सांगितलं. अनुमोदक रमेश वंसकर होते.

ठराव क्रमांक 4 :

पुस्तकांच्या किमती नियंत्रित करण्यासाठी प्रकाशकांना छपाई आणि कागद खर्चात सबसिडी देण्यात यावी. तसेच, त्यांना जीएसटीमधून वगळण्यात यावे, यासाठी प्रयत्न करावा. अशी मागणी सूचक डॉ. नरेंद्र पाठक यांनी केले. त्याला अनुमोदन प्रकाश पागे यांनी दिले.

हे सुद्धा वाचा

ठराव क्रमांक 5 :

कोणत्याही कारणास्तव राज्यातील अनुदानित व विनाअनुदानित मराठी आणि सेमी इंग्रजी शाळांचे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये रूपांतर केले जाणार नाही. यासाठी विधिमंडळात कायदा करण्यात यावा, अशी मागणी सूचक विलास मानेकर यांनी केली. त्याला अनुमोदन प्रकाश पायगुडे यांनी दिले.

ठराव क्रमांक 6 :

महाराष्ट्रातील अनेक बोलीभाषा अस्तंगत होत आहेत. बोलीभाषांच्या संवर्धनासाठी शासनाने ‘बोलीभाषा विकास अकादमी’ स्थापन करावी, अशी मागणी सूचक डॉ. दादा गोरे यांनी केली. या ठरावाला अनुमोदन प्रकाश होळकर यांनी केले.

ठराव क्रमांक 7 :

राज्य मराठी विकास संस्थेच्या उद्दिष्ट क्रमांक 13 नुसार महाराष्ट्राबाहेरील अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या समाविष्ट व संलग्न संस्थांना 5 लाख अनुदान प्रतिवर्षी वित्तीय वर्षाच्‍या सुरुवातीला देण्यात यावे. अशी विनंती या ठरावाद्वारे सूचक डॉ. विद्या देवधर यांनी केली. त्याला पुरुषोत्तम सप्रे यांनी अनुमोदन दिले.

ठराव क्रमांक 8 :

बृहन्महाराष्ट्रातील मराठी माध्यमांच्या अनेक शाळा आणि हैदराबादमधील मराठी साहित्य परिषदेतर्फे चालविण्यात येणारे मराठी महाविद्यालय बंद होण्याच्या मार्गावर आहे. या शिक्षण संस्थांना शासनाने त्वरित अनुदान देऊन त्या चालू ठेवण्यास सहकार्य करावे. असा ठराव सूचक डॉ. विद्या देवधर यांनी सुचविला. त्य ठरावाला अनुमोदन अमृत केशव आकरे यांनी दिले.

ठराव क्रमांक 9 :

म्हादई नदी प्रामुख्याने गोव्यातून वाहते. ती कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी वळविण्याचा प्रयत्न होतो आहे. सदर नदी वळविल्यास पाण्याची तीव्र टंचाई होईल. म्हणून ही नदी न वळवण्याचा विचार व्हावा, अशी विनंती केंद्र सरकारला करावी. असा ठराव सूचक रमेश वयस्कर यांनी केला. त्याला अनुमोदन राजमोहन शेटिये यांनी दिले.

ठराव क्रमांक 10 :

पुरस्कार निवड समितीच्या सदस्यांनी पुरस्कारासाठी मराठी ग्रंथांची निवड करताना, ते ग्रंथ व्यवस्थित वाचूनच निर्णय घ्यावा. पुरस्कार जाहीर केल्यानंतर शासनाने तो परत घेऊ नये, अशी मागणी 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाद्वारे सूचक डॉ. मिलिंद जोशी यांनी केली. या ठरावाला अनुवादन किरण सागर यांनी दिले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.