उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहणार की नाही? मुदत संपल्यानंतर पक्षप्रमुख कोण? घटनातज्ज्ञ उल्हाट बापट यांनी स्पष्टच सांगितलं

केंद्रीय निवडणूक आयोगात पक्षप्रमुख पदाच्या निवडीबाबत प्रत्यक्ष तसा कायदा नाही असं सांगत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी राज्यपाल निवडीचा संदर्भ देत प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहणार की नाही? मुदत संपल्यानंतर पक्षप्रमुख कोण? घटनातज्ज्ञ उल्हाट बापट यांनी स्पष्टच सांगितलं
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 1:07 PM

पुणे : 23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख या पदावर कार्यकाळ संपला आहे. त्याकरिता उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्षप्रमुख पदाची निवडणूक घेण्यासाठीची मागणी केली होती, निवडणूक शक्य नसल्यास उद्धव ठाकरे यांनाच पक्षप्रमुख पदावर कायम करण्याची मागणी करण्यात आली होती. ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी याबाबत पत्रकार परिषदेत नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशातच घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी महत्वाचे विधान केले आहे. प्रत्यक्ष कायदा निवडणूक आयोगात याबाबत नाही मात्र उल्हास बापट यांनी राज्यपाल पदाबाबतचा संदर्भ देऊन पक्षप्रमुखपदाबाबत स्पष्टच सांगितलं आहे.

घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगात प्रत्यक्ष तसा कायदा नाही, परंतु सर्वधारण कायद्यानुसार राज्यपाल हे पाच वर्षासाठी असतात, मात्र त्यांचा कालावधी संपला तरी नवीन राज्यपाल येईपर्यंत ते पदावर असतात.

हे सुद्धा वाचा

राज्यपाल यांच्या निवडीप्रमाणेच उद्धव ठाकरे यांच्याबाबत होऊ शकतं, नवीन कोणाची निवड झाली नाही तर उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख पदावर राहतील असे चित्र आहे, असं देखील उल्हास बापट यांनी म्हंटलं आहे.

एकूणच उद्धव ठाकरे यांच्यासाठी घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी जसे सांगितले तसे घडल्यास उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे येत्या काळात धनुष्यबाण चिन्हा बरोबरच पक्षप्रमुख पदाचा मुद्दाही महत्वाचा ठरणार आहे.

शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबरोबरच आता पक्षप्रमुख पदाचा मुद्दा येत्या काळात अधिक चर्चिला जाणार आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये कुणाला काय मिळणार याकडे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.