पोस्टल मतांमध्ये बाजी मारताच अश्विनी जगताप स्पष्टच बोलल्या, कोणतीही धाकधूक नाही, पण…
चिंचवड पोटनिवडणुकीत पोस्टल मतदान पार पडल्यानंतर अश्विनी जगताप आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर बोलत असतांना अश्विनी जगताप यांना लक्ष्मण जगताप यांची आठवण आली होती.
पुणे : चिंचवड पोटनिवडणूकीत पोस्टल मतदानात भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप ( Ashwini Jagtap ) यांनी बाजी मारली आहे. पोस्टल मतांमध्ये अश्विनी जगताप यांना चारशे मत मिळाली आहेत. तर सलग दोन फेऱ्यांमध्ये अश्विनी जगताप आघाडीवर असून महाविकास आघाडीचे नाना काटे यांना पिछाडीवर टाकले आहे. यानंतर अश्विनी जगताप यांनी प्रतिक्रिया देत असतांना म्हणाल्या, पोस्टल मतदानात आघाडीवर आहे ही साहेबांनी ( Laxman Jagtap ) केलेल्या कामाची पावती आहे. आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर आम्ही निवडणूक लढविली आहे. मेट्रो सिटी आणि स्मार्ट सिटीच्या च्या माध्यमातून विकास करणार असल्याचे यावेळी अश्विनी जगताप यांनी सांगून टाकलं आहे. दरम्यान निवडणुकीत किंवा विजयाबद्दल कुठलीही दाखधुक वाटत नसून विजय हा निश्चित असल्याचा दावा अश्विनी जगताप यांनी व्यक्त केला आहे.
पोस्टल मतदानात अश्विनी जगताप यांना 400 मतं मिळाली असून दुसऱ्या फेरी पर्यंतर अश्विनी जगताप यांची आघाडी कायम आहे. पहिल्या फेरी अखेर अश्विनी जगताप यांना 4053 मत मिळाली आहे, नाना काटे यांना 3604 मत तर अपक्ष राहुल कलाटे यांना 1273 मत मिळाली आहे.
चिंचवड मतदार संघात खरंतर आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर ही पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यामध्ये भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकरून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली होती.
दरम्यान याच वेळी मागील निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर राहिलेले राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता. त्यामुळे तिरंगी लढत ही चिंचवडमध्ये पाहायला मिळाली आहे. त्यामध्ये अश्विनी जगताप या आघाडीवर आहे.
चिंचवड मतदार संघात अश्विनी जगताप यांनी प्रचार करत असतांना लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतं मागितली होती. तर भाजपच्या दिग्गज नेत्यांनी यावेळी प्रचार करत अश्विनी जगताप यांना निवडणूक आणण्यासाठी ताकद लावली होती.
तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सोडण्यात आली होती. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने नाना काटे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे अजित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी प्रचार करत नाना काटे यांना निवडून आणण्यासाठी मोठी ताकद लावली होती.
मात्र, यामध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवली होती हे स्पष्ट हॉट आहे. त्यामुळे निकाल काय लागतो त्यात कुणाला किती मते मिळतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.