Dombivli : राखी पोर्णिमेची अशी ही ओवाळणी, 27 गावांचा पाणीप्रश्न मार्गी लावण्याची मंत्री चव्हाण यांचा ग्वाही

कल्याण ग्रामीण भागातील 27 गावांचा पाणीप्रश्न हा मार्गी लावला जाणार असल्याचे आश्वासन भर कार्यक्रमात चव्हाण यांनी दिले आहे. वाढत्या नागरिकीकरणासोबत नवीन धरण तयार होणं गरजेचं आहे त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित प्रयत्न करेल असे चव्हाण म्हणाले. कुशिवली आणि काळू धरण यांचा रखडलेला प्रश्नही मार्गी लावण्यात येईल असं ते म्हणाले.

Dombivli :  राखी पोर्णिमेची अशी ही ओवाळणी, 27 गावांचा पाणीप्रश्न मार्गी लावण्याची मंत्री चव्हाण यांचा ग्वाही
कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 8:39 PM

डोंबवली : रक्षाबंधणाच्या निमित्ताने राजकीय नेते, सिनेअभिनेते यांचे फोटो (Social Media) सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. पण कॅबिनेट मंत्री यांनी (Kalyan Gramin) कल्याणच्या ग्रामीण भागातील महिलांना राखीपोर्णिमेची ओवाळणी दिली आहेत. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर (Ravindra Chavhan) भाजपाचे रवींद्र चव्हाण हे कल्याण ग्रामीण परीसरात एका कार्यक्रमासाठी आले होते. दरम्यान, कार्यक्रम प्रसंगी उपस्थित महिलांनी त्यांना राखी बांधत परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून या भागातील 27 गावचा पाणीप्रश्न हा मिटलेला नाही. आज रक्षाबंधनाचे मुहूर्त साधत कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी 27 गावांचा पाणीप्रश्न लागलीच मार्गी लावला जाणार असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर हीच राखीपोर्णिमेची ओवाळणी असणार असेही ते म्हणाले. त्यामुळे एका भावाने दिलेले आश्वासन पाळले जाणार का हेच पहावे लागणार आहे.

पाणीप्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध

कल्याण ग्रामीण भागातील 27 गावांचा पाणीप्रश्न हा मार्गी लावला जाणार असल्याचे आश्वासन भर कार्यक्रमात चव्हाण यांनी दिले आहे. वाढत्या नागरिकीकरणासोबत नवीन धरण तयार होणं गरजेचं आहे त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित प्रयत्न करेल असे चव्हाण म्हणाले. कुशिवली आणि काळू धरण यांचा रखडलेला प्रश्नही मार्गी लावण्यात येईल असं ते म्हणाले. पाणी समस्येबाबत टेंडर काढण्यात आले आहे. मात्र टाक्या स्टील च्या असाव्यात की प्लास्टिकच्या हे अद्याप ठरलं नाही.यावर तोडगा काढण्यासाठी लवकरच केडीएमसी आयुक्तांची भेट घेणार आहे. त्यामुळे आता मतदार भगिनींना दिलेलं आश्वासन कधी पूर्ण होत ते पाहावं लागेल असेही ते म्हणाले आहेत.

राज्यासह केंद्राचीही मदत

आता राज्यात आणि केंद्रात एकच सरकार असल्याने विकास कामांमध्ये अडचण निर्माण होणार नाही. दिवसेंदिवस शहराला लागून असलेल्या या गावांमध्ये नागरिकांची संख्या वाढत आहे. वाढत्या नागरिकरणाबरोबरच येथे सोई-सुविधाही पुरवणे गरजेचे आहे. त्यामुले कुशवली आणि काळू धरणाचा रखजलेला प्रश्न तर मार्गी लावला जाणारच आहे पण नवीन धरण बांधणीसाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. वेळप्रसंगी केंद्राचीही मदत घ्यावी लागली तरी पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बहिणींना दिलेले आश्वासन पूर्ण करणार

आज राखीपोर्णिमेच्या दिवशी या 27 गावच्या महिलांना पाणीप्रश्न मार्गी लावणार असे आश्वासन रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे. त्यामुळे या आश्वसानाची पूर्तता ही करावीच लागणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे. कल्याण डोंबिवली शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचा प्रश्न भेडसावतोय.कल्याण ग्रामीण भागातही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्याअनुशंगाने महिलांनी केलेली मागणी पूर्ण करणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.