अजित पवार गटातील मंत्र्यांच्या ‘त्या’ भेटीनंतर शरद पवार काय म्हणाले? ‘या’ नेत्याने सांगितली ‘अंदर की बात’

अजित पवार गटाने शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चाना एकच उधाण आले. मात्र, यावर शरद पवार यांनी काय भूमिका घेतली याची उत्सुकता असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्याने शरद पवार काय म्हणाले याची माहिती देत 'अंदर की बात' सांगितली.

अजित पवार गटातील मंत्र्यांच्या 'त्या' भेटीनंतर शरद पवार काय म्हणाले? 'या' नेत्याने सांगितली 'अंदर की बात'
SHARAD PAWAR AND AJIT PAWAR Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jul 16, 2023 | 7:06 PM

मुंबई | 16 जुलै 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांनी शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. या भेटीनंतर नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार हे आमचे दैवत आहे. ते इथे आल्याचे आम्हाला कळले त्यामुळे ही संधी साधून त्यांची वेळ न मागता त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचे सांगितले. राष्ट्रवादी पक्ष एकसंघ राहू शकतो यासाठी त्यांनी योग्य विचार करावा अशी विनंती केल्याचेही पटेल म्हणाले. यशवंतराव चव्हाण येथे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी नाशिकमधील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आले होते. ही संधी साधून अजित पवार गट येथे आला. मात्र, त्यानंतर या पदाधिकाऱ्यांशी बोलताना शरद पवार यांनी युवकांवर मोठी जबाबदारी आहे असे सांगितले.

आपल्याला पुरोगामी विचारासोबत राहायचे आहे. काही लोकांनी विनंती केली. पण, आपल्याला पुरोगामी विचार पुढे घेवून जायचे आहे असे शरद पवारांनी सांगितले अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनीही प्रसार माध्यमांशी बोलताना शरद पवार यांच्या भूमिकेत कुठलाही बदल नाही. भाजपसोबत जाण्यास त्यांचा विरोध आहे. शरद पवार गट उद्या विधानसभेत विरोधी बाकावर बसणार आहे. राष्ट्रवादी पक्षाने विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. यात राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांना सोडता इतर आमदारांची व्यवस्था विरोधी पक्षांत करा अशा मागणी केल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, राष्ट्रवादीच्या आमदारांना व्हिप जारी केला आहे असेही त्यांनी सांगितले.

शरद पवार यांची पुरोगामी महाराष्ट्राची भूमिका ही 70 वर्षाची भूमिका आहे. ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. बंगलोर येथे काँग्रेसने बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बेठकीला शरद पवार हजर राहणार आहेत असेही आव्हाड म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी सैनिक महिला सेलच्या नियुक्त्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्या आहेत. अँड. मेघा कुलकर्णी यांची राज्यप्रमुखपदी निवड करण्यात आली असून सुप्रिया सुळे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.