लाडकी बहीण योजना किती आवडली? महिलांच्या संमिश्र प्रतिक्रिया; काय म्हणाल्या?

राज्यातील 21 ते 60 वयोगटातील महिलांच्या बॅंक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना जाहीर केल्यानंतर महिलांनी त्यांना राखी बांधली आहे. परंतू समाजातील विविध स्तरातील महिलांनी या योजनेबद्दल काय म्हटले आहे ? त्यांच्या भावना जाणून घ्या....

लाडकी बहीण योजना किती आवडली? महिलांच्या संमिश्र प्रतिक्रिया; काय म्हणाल्या?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महिलांना राखी बांधली
Follow us
| Updated on: Jun 29, 2024 | 8:03 PM

राज्यात 1 जूलैपासून ‘मुख्यमंत्री लाडकी योजना लागू होणार आहे. या योजनेमुळे महिलांचे सबलीकरण होणार आहे. राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ जाहीर केली. या योजनेमुळे आता महिलांना 1500 रुपये दर महिन्याला खात्यात जमा होणार आहेत. या योजनेचा लाभ 21 ते 60 वयोगटातील महिलांना होणार आहे, या योजनेबद्दल समाजातील विविध स्तरातील महिलांनी संमिश्र प्रतिक्रीया दिली आहे.

  महिलांनी केले स्वागत

शासनाचा निर्णय योग्यच आहे, आतापर्यंत शासनाच्या योजना जो तळे राखेल तोच पाणी चाखेल अशा होत्या. मोठमोठ्या घरातील धनदांडग्यांनीच त्या लाटलेल्या आहेत. ज्यांच्यासाठी या योजना काढल्यात त्या वंचितांपर्यंत या योजनांचा लाभ कधीच गेला नाही. एका व्यक्तीला एकाच सरकारी योजनेचा लाभ मिळवा हा शासनाचा निर्णय रास्तच आहे. आमचीही हीच मागणी असल्याचे इगतपुरीच्या वैशाली आडके यांनी म्हटले आहे. सरकारने ज्या अटी घातल्या त्या बरोबर आहेत. आताची नवीन पिढीची मुलांना सरकारी नोकरी मिळत त्यांना खाजगी नोकरी करावी लागते. तेथे ही सरकारी नोकरी इतकं पेमेंट पण मिळत नाही. त्यामुळे पती कामासाठी दूरवर जातात आणि त्यांच्या मिसेसना आता लाभ भेटणार ते चांगले आहे. ज्या अटी आणि त्यांनी लागू केलेल्य योग्य आहेत असे सुमन शिरसाठ यांनी प्रतिक्रीया देताना सांगितले. ज्यांना गरज आहे त्यांना हा सन्मान निधी द्यावा, ज्यांना गरज नाही अशांना देऊ नये. ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांनाच योजना लागू करा. जे लोक आधीपासून योजनेचा लाभ घेतात त्यांना देऊ नये अशी मागणी संगिता डावखर यांनी केली आहे.

विरोधकांनी टीका

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण‘ योजना काल अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाचे वाचन करताना जाहीर केली होती. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीआर काढीत ही योजना 1 जूलैपासून लागू करण्याची घोषणा थेट घोषणा करुन टाकली. त्यामुळे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. अजून राज्यपालांनी बजेट मंजूर केले नाही आणि सभागृहात त्यावर चर्चा झाली नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी लागलीच कॅबिनेट घेऊन आदेश कसा काढला असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.

Non Stop LIVE Update
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा.
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण.
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?.
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी.
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली.
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?.
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम.
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं.
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून.
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा.