Parbhani : काय सांगता..? ग्रामस्थांनी गावच विक्रीला काढले की, नेमका प्रकार काय?
देशात नुकतान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात पार पडला. पण याच देशातील गावची अशी दैयनिय स्थिती असून गावकऱ्यांनी थेट विक्रीलाच काढले आहे.
नजीर खान प्रतिनिधी टीव्ही9 मराठी परभणी : ऐकावं ते नवलच, आता परभणी जिल्ह्यातील (Parbhani District) एका गावच्या ग्रामस्थांनी थेट आपले गावच विक्रीला काढले आहे. बरं ते काय एखादी वस्ती किंवा लहान गाव असंही नाही. तब्बल 3 हजार लोकवस्ती असलेलं ते गाव (Village) आहे. गाव विक्रीला काढले आहे हे इतरांच्या लक्षात यावे म्हणून येथील ग्रामस्थांनी तसे फलकच लावले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमके गावकऱ्यांनी हे केले कशासाठी? मात्र, माहेर येथील ग्रामस्थांना आजही मूलभुत सोई-सुविधाच (basic amenities) मिळालेल्या नाहीत तर पीक विम्यातूनही या गावाला वगळण्यात आले आहेत. त्यामुळे शासनाचा कोणताच आधार गावाला नसल्याने गावकऱ्यांनी थेट गावच विक्रीला काढले आहे.
माहेर हे परभणी जिल्ह्यातील एक गाव असून त्याची लोकसंख्या ही 3 हजार आहे. गावची लोकसंख्या अधिक आहे शिवाय क्षेत्रफळही जास्त आहे. असे असतानाही लोकप्रतिनीधींचे विकास कामांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्रस्त ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.
केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी निवडणुकांच्या प्रसंगी वेगवेगळी आश्वासने दिली जातात, पण पूर्तता काहीच होत नाही. गावाला रस्ता नाही की विजेची सोय नाही. मुलभूत सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांची हेळसांड सुरु आहे.
देशात नुकतान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात पार पडला. पण याच देशातील गावची अशी दैयनिय स्थिती असून गावाला साधा रस्ताही नाही. शिवाय पीक विम्यापासून गावाला वंचित ठेवण्यात आले आहे.
गाव विक्रीला हे केवळ सांगण्यापुरतेच नाही तर ग्रामस्थांनी तसा फलकही लावला आहे. जर सरकारने विक्रीसाठी परवानगी दिली नाही तर खाजगी राज्याचा दर्जा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार हे पहावे लागणार आहे.