Sangli : जनावरांच्या संरक्षणासाठी तरुण शेतकऱ्याची भन्नाट ‘आयडिया’, ना बिबट्याचे टेंन्शन ना कोणता पहारा..!
राहुल देसाई याने शेत वस्तीवर अशाप्रकारे बुजगावणे उभारण्यामागेही एक कारण आहे. ज्या भागात ही लोकवस्ती वसलेली आहे तिथे बिबट्याचा वावर कायम असतो. शिवाय पाच महिन्यापूर्वी शिंगटेवाडी ते भाटशिरगावच्या मध्यावर असणाऱ्या एका वस्तीवरील लहान रेडकांवर बिबट्याने हल्ला केला होता. यामध्ये रेडकांचा जागीच मृत्यू झाला होता.
सांगली : जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील भाटशिरगाव हे डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. त्यामुळे या शेतवस्तीला कायम (The fear of the leopard) बिबट्याची धास्ती ही राहतेच. आता जंगली भाग म्हणल्यावर बिबट्या काय सांगून येणार हायं व्हयं? बरं (Protection of animals) जनावरांचे संरक्षण तरी किती वेळ आणि कोणी करायचे, या सर्व परस्थितीवर मात करण्यासाठी येथील तरुणाने एक भन्नाट आयडिया केली आहे. ज्या वस्तीवर जनावरे आणि आई-वडिलही राहतात त्या वस्तीवरील घराला पाहरेकरी ठेवले आहेत. आहो पाहरेकरी म्हणजे खरेखुरे नसले तरी हुबेहुब माणसाप्रमाणेच आहेत. त्याला ग्रामीण भागात (The replica of men) बुजगावणं अस म्हणतात. केवळ एकाच ठिकाणी नाही तर घराला लागून दोन-तीन ठिकाणी असे बुजगावणे येथील राहुल शंकर देसाई याने उभारले आहे. त्यामुळे बिबट्यापासूनचा धोका तर टळला आहे पण धानपिकाचेही नुकसान टळलेले आहे.
…म्हणून तरुणाचा हा अनोखा उपक्रम
राहुल देसाई याने शेत वस्तीवर अशाप्रकारे बुजगावणे उभारण्यामागेही एक कारण आहे. ज्या भागात ही लोकवस्ती वसलेली आहे तिथे बिबट्याचा वावर कायम असतो. शिवाय पाच महिन्यापूर्वी शिंगटेवाडी ते भाटशिरगावच्या मध्यावर असणाऱ्या एका वस्तीवरील लहान रेडकांवर बिबट्याने हल्ला केला होता. यामध्ये रेडकांचा जागीच मृत्यू झाला होता. तर याच वस्तीवर राहुल याचेही जनावरे आणि घरी आई-वडिल असतात. त्यामुळे घराच्या कडेला त्याने बुजगावणे पण हुबेहुब माणसासारखे उभारले आहे. त्यामुळे गेल्या 5 ते 6 महिन्यांमध्ये इकडे कोणताही वन्यप्राणी फिरकलेला नाही.
कामानिमित्ताने राहुल परगावी
राहुल हा कामानिमित्ताने बाहेरगावी असतो तर इकडे आई-वडिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे त्याने नामी शक्कल लढवत हा अनोखा हा प्रयोग केला आहे. शिवाय यामुळे अद्यापपर्यंत कोणता धोकाही निर्माण झालेला नाही. यासाठी राहुलने ज्या कंपनीत काम करतो तेथीलच चांगले कपडे आणून ,त्याचे माणसासारखे दिसणारी बुजगावणी तयार करून बिबट्याचा वावर असणा-या क्षेत्रात बिबट्या फिरकणार नाही अशी व्यवस्था केली आहे. बारावी नंतर पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून पुण्याच्या खासगी कंपनीत राहुल काम करीत आहे.
जनावरे उघड्यावर, तरीही धोका नाही
शेतवस्तीवर राहुल देसाई याच्या जनावरांसाठी कोणताही गोठा नाही. जनावरे ही उघड्यावरच असतात. असे असतानाही जनावरच्या बाजूने सर्व बुजगावणे उभारलेले आहेत. त्यामुळे गेल्या 5 महिन्यांमध्ये एकदाही बिबट्या वस्तीकडे फिरकलेला नाही. त्यामुळे राहुलच्या जनावरांचे तर संरक्षण होत आहे पण इतरांच्या जनावरांसाठीही हे फायद्याचे ठरत आहे. त्याने केलेला प्रयोग खऱ्या अर्थाने यशस्वी झाला आहे.