राज्यात निवडणुका झाल्या तर भाजपला किती जागा मिळतील? जयंत पाटील यांची भविष्यवाणी काय ?
शिक्षकांनी देखील आमचे उमेदवार म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून दिले. आता ज्या राज्यातल्या निवडणुका झाल्या त्यात सुशिक्षित मतदार होते असं जयंत पाटील यांनी म्हंटलं आहे.
मुंबई : टीव्ही 9 मराठी आयोजित महाराष्ट्राचा महासंकल्प ( Maharashtra Mahasankalp ) या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनीही उपस्थिती लावली होती. यामध्ये जयंत पाटील यांनी भाजपबाबत भविष्यवाणी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. जयंत पाटील यांनी थेट भाजप सत्तेतच येणार नसल्याचा एकप्रकारे दावा केला असून महाविकास आघाडीचीच सत्ता येणार असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जयंत पाटील यांनी कोणत्या आधारावर हा दावा केला आहे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
जयंत पाटील यांनी महाराष्ट्राच्या महासंकल्प या कार्यक्रमात बोलत असतांना पदवीधर निवडणुकीचा आधार घेतला आहे. यामध्ये जयंत पाटील पुढे म्हणाले, अलीकडे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका झाल्या, त्यात पदवीधरांनी देखील आमचे उमेदवार निवडून दिले.
शिक्षकांनी देखील आमचे उमेदवार म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून दिले. आता ज्या राज्यातल्या निवडणुका झाल्या त्यात सुशिक्षित मतदार होते त्यांनी महाविकास आघाडीलाच प्राधान्य दिले आहे.
त्यामुळे राज्यातल्या कानाकोपऱ्यापर्यन्त म्हणजेच गडचिरोली पासून चंद्रपूर पर्यन्त आणि बुलढाणा पासून मराठवाड्यापर्यन्त सगळ्यांनीच महाविकास आघाडीला मतदार केलं. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात या निवडणूक नव्हत्या पण मागे ज्या निवडणुका झाल्या त्यात महाविकास आघाडी निवडून आली आहे.
त्यामुळे तिन्ही पक्ष एकत्रित आले तर भारतीय जनता पक्षाचा पराभव निश्चित आहे. प्रत्येक निवडणुका या वेगळ्या असतात पण विधानपरिषदेच्या निवडणुकीवर जयंत पाटील यांनी अंदाज लावत मोठा दावा केला आहे.
विधानपरिषद आणि महानगरपालिका याच्यात वेगळा विचार करून माणसे मतदान करतात. प्रत्येक निवडणुक वेगळी असते आणि ज्यावेळी महाराष्ट्राचे चित्र समोर यायचं असतं त्यावेळी वेगळं चित्र असतं असेही जयंत पाटील यांनी म्हंटलं आहे.
एकाच दिवशी विदर्भात मध्ये दोन ठिकाणी निवडणुका झाल्या, मराठवाड्यात निवडणुका झाल्या, कोकणात निवडणुका झाल्या, खान्देशमध्ये निवडणुका झाल्या या सर्व ठिकाणी सुशिक्षित मतदारांनी मतदान केलं.
त्याचा मी आपल्याला आधार देतो. पण तसे कधीही तुम्ही निवडणुका घेतल्या तर तिन्ही पक्ष एकत्रित राहिले तर भारतीय जनता पक्षाला 40 – 50 किंवा फारतर फार 60 जागा मिळतील असं जयंत पाटील यांनी म्हंटलं आहे.
त्यामुळे एकूणच जयंत पाटील यांनी केलेल्या या भविष्यवाणीमुले राजकीय चर्चेला उधाण येणार यामध्ये कुठलीच शंका येणार नाही, पण भविष्य काळात जयंत पाटील यांची भविष्यवाणी खरी ठरते का ? हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.