आमदारांच्या बैठकित मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र काय? मंत्री उदय सामंत यांनी सांगितली आतल्या गोटातील माहिती
शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी प्रसार माध्यमांना दिली. सगळ्या आमदारांनी खासदारांनी पहिली महत्त्वाची भूमिका घेतली की आमचा पूर्ण विश्वास हा शिवसेनेचे मुख्य नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर आहे
मुंबई | 31 ऑक्टोंबर 2023 : मराठा आरक्षणावरून राजीनामा देऊन नागरिकांचे प्रश्न सुटणार नाही. सरकारमध्ये राहून नागरिकांचे प्रश्न सोडवा. नागरिकांमध्ये जाऊन काम करा. सरकारला टिकणारं मराठा आरक्षण द्यायचं आहे. सरकार सकारात्मक आहे. सरकारने आतापर्यंत मराठा आरक्षणाबाबत घेतलेले निर्णय नागरिकांपर्यंत पोहचवा. आपआपल्या मतदार संघात कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या. आंदोलनाच्या नावाखाली आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्या समाज कंटकांवर करडी नजर ठेवून पोलिसांच्या निदर्शनास त्या गोष्टी आणून द्या असा कानमंत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या आमदार आणि खासदार यांना दिला. विरोधकांच्या टिकेकडे दुर्लक्ष करा असेही ते म्हणाले.
मंत्री उदय सामंत यांनी मराठा आरक्षणाच्या बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेमध्ये घेतली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. त्याचे तंतोतंत पालन करून ते मराठा आरक्षण देतील त्याची पूर्ण खात्री आम्हाला सगळ्या शिवसेनेचे आमदारांना आणि खासदारांना आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून तो विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठा आरक्षण कसे टिकेल यासाठी जो प्रयत्न केला जातो आणि महाराष्ट्र आरक्षण दिल्यानंतर न्यायालयामध्ये ते बाद होणार नाही याची प्रोसिजर सगळे आमदारांना सांगितले अशी माहिती त्यांनी दिली.
अहवालात वाढ होणार आहे
सर्वप्रथम जरांगे आंदोलनाला बसले त्यांची मागणी होती की कुणबी प्रमाणपत्र दिले पाहिजे . त्यानंतर शिंदे समितीची स्थापना झाली. त्यांनी आज कॅबिनेटमध्ये अहवाल सादर केला. त्याच्यामध्ये जे काही नोंदी मिळालेले आहेत. त्यांना कुणबी प्रमाण पत्र देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या. त्याचा फायदा मराठवाड्यातील अनेक मराठा समाजाच्या लोकांना होणार आहे. परंतु तो जो अहवाल आहे तो प्राथमिक अहवाल आहे अजून त्याच्या अहवालात वाढ होणार आहे, असे सामंत म्हणाले.
सुप्रीम कोर्टामध्ये न्यू पिटीशन दाखवलं होतं
पूर्वी प्रमाणपत्र देण्याची जी सुरुवातीची मागणी होती त्याच्यावर मुख्यमंत्री यांनी हा सकारात्मक निर्णय घेतला आणि दुसरा महत्त्वाचा निर्णय जे सुप्रीम कोर्टामध्ये न्यू पिटीशन दाखवलं होतं त्याची देखील विंडो ओपन झालेली आहे. त्यासाठी माजी न्यायमूर्तींची समिती नेमली आहे. त्यांच्याकडून सल्ला घेऊन, मदत घेऊन टिकाऊ आरक्षण हे कशा पद्धतीने मराठा समाजाला मिळेल त्याच्यावर युद्धपातळीवर काम स्वतः मुख्यमंत्री करत आहेत असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र पेटवण्यामध्ये काही लोकांना आनंद
जी काही रचना स्वतः शिंदे साहेब करत आहेत त्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. परंतु हे सगळं करत असताना ज्या काही पत्रकार परिषदा होत आहेत. त्या पत्रकार परिषदा घेणाऱ्या सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना सांगायचे की महाराष्ट्र पेटवण्यामध्ये काही लोकांना जर आनंद वाटत असेल तर ती दुर्दैवी बाब आहे. पत्रकार परिषदेमधून मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये स्वतः काय केलं हे देखील सांगणं गरजेचं आहे. आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये का टिकलं नाही हे देखील सांगणं गरजेचं आहे, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
मराठा समाजाचे नेते होते त्यांचे धाबे दणाणले आहेत
एखाद्या गोष्टीचा फायदा घेऊन लोकांना भडकवण्याचे जे काम करतायेत ते दुर्दैवी आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फायदा घेऊन अनेक प्रस्थापित लोक मराठा समाजाचे नेते होते त्यांचे धाबे दणाणले आहेत. म्हणून कुठूनही या सर्वसामान्य मराठा समाजाच्या व्यक्तीला मुख्यमंत्री बसल्यावर अडचणीत आणायचं कुठून तरी टार्गेट करायचा अशा पद्धतीची भूमिका या आंदोलनाच्या मागे घेतली जाते की काय असा देखील एक संशय येण्यासारखं वातावरण निर्माण झालेलं आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.