शरद पवार गटाचं महाविकास आघाडीतील स्थान काय?, जितेंद्र आव्हाड म्हणाले, आम्हाला…

लालबागचा राजा भायखळामधून जातो तेव्हा मुस्लीम समुदायाकडून  त्याचं प्रचंड मोठं स्वागत केलं जातं. प्रथा आहे प्रथेला गालबोट लागू नये मुसलमान समाजामधील नेत्यां हा निर्णय घेतला आहे त्यांच्या या निर्णयाचे कौतुक करायला हवे असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

शरद पवार गटाचं महाविकास आघाडीतील स्थान काय?, जितेंद्र आव्हाड म्हणाले, आम्हाला...
Jitendra awhad
Follow us
| Updated on: Sep 14, 2024 | 7:46 PM

एकीकडे विधान सभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. तर दुसरीकडे महायुतीत आणि महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण ?आणि मोठा भाऊ – छोटा भाऊ कोण ? यावरुन वादविवाद सुरु आहेत. तसेच कॉंग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी महाविकास आघाडीत आमच्या जागा जास्त असल्याने आम्ही मोठा भाऊ आहोत अशा इशारा दिला आहे. याबाबत आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर उत्तर दिले आहे.

महाविकास आघाडीत एकीकडे उद्धव ठाकरे नाराज असल्याचे वृत्त आहे. राहुल गांधी यांच्या अलिकडे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे उपस्थित राहीले नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची नाराजी कशी दूर करणार याचा पेच असतानाच आता कॉंग्रेसचे नागपूरचे नेते नितीन राऊत यांनी सर्वात जास्त खासदार कॉंग्रेसकडे असल्याने कॉंग्रेसच महाविकास आघाडीत भाऊ असल्याचे म्हटले आहे. या संदभार्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रीया विचारली असता त्यानी आम्हाला छोटा भाऊ व्हायचंय, त्यामुळे मोठा भाऊ कोण आहे यात आम्हाला पडायचं नाही असे उत्तर दिले आहे.

ठाण्याच्या आनंद आश्रमात नोटा उधळताणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. केदार दिघे यांनी हा व्हिडीओ व्हायरले आहे. यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टिका केली आहे. आज जर आनंद दिघे असते तर त्यांनी नोटा उधळणाऱ्यांना हंटरने चोपून काढले असते अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ज्याला मूळात तुम्ही ज्याला ‘आनंद आश्रम’ म्हणता, त्यात तुम्ही ढोल ताशे वाजवायला गेलात कशाला? जिथे दिघे साहेब राहायचे तिथे ते गेले कशाला ? संस्कार नसलेले, संस्कृती माहीत नसलेले लोक आहेत. दिघे साहेबांच्या अंगावर पैसे उडवलेले मी कधी ही पाहिले नाही अशी जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

भुजबळ सांगत असलेला घटनाक्रम चुकीचा

छगन भुजबळ सांगत असलेला हा घटनाक्रम अतिशय चुकीचा आहे. शरद पवार हे कुणालाही न बोलवता, कळवता हे सगळं झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी आठ वाजता तिथे पोहोचले होते. भुजबळ म्हणातात त्यातले काही खरं नाही. लाठीमारानंतर जर महाराष्ट्रातील कोणता नेता जरांगेंची चौकशी करायला गेला असेल तर त्याचे नाव शरद पवार आहे असेही आव्हाड यावेळी म्हणाले.

गिरीश महाजन वायरल व्हिडिओ..

मतदार संघात काम केल्यावर पळावे लागत नाही. काम केलं नसेल तर लोकांचा राग हा असतो. आम्ही नाही पळत कधी मतदारसंघातून.. मी तर दिवसभर मतदारसंघात असतो. काम केलं तर घाबरायचं नाही. माझं वाक्यच आहे, काम बोलेगा.. काम बोलता आहे..

म्हणून ईदची मिरवणूक पुढे ढकलली

16 तारखेला ईदच्या मिरवणूका निघाल्या असत्या तर त्या रात्रीपर्यंत चालल्या असत्या. परंतु मुंबईत गणपती त्याच रस्त्याने जातात. त्यामुळे मुस्लिम मुलांनी मीटिंग घेतली आणि उगाच वाद नको आपली सण मिरवणूक कधीही निघू शकते म्हणून त्यांनी निर्णय घेतला..ही सामंजसाची भूमिका आहे, कुठेही ठिणगी पडू नये कुठेही धर्मद्वेष वाढू नये, कित्येक ठिकाणी तुम्हाला असे बघायला मिळेल. मुंबईतही लालबागच्या राजावर मुस्लीम समुदायाकडून फुलांचा वर्षाव होतो असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.
'राहुल गांधींची जीभ छाटू नये, जिभेला चटके..',भाजप खासदाराची जीभ घसरली
'राहुल गांधींची जीभ छाटू नये, जिभेला चटके..',भाजप खासदाराची जीभ घसरली.
बहिणींनंतर आता भाऊही लाडके... अजितदादांच्या 'त्या' जाहिरातीची एकच चर्च
बहिणींनंतर आता भाऊही लाडके... अजितदादांच्या 'त्या' जाहिरातीची एकच चर्च.
महायुती-मविआत चर्चा सुरू, जागांवरून रस्सीखेच, कोण-कुठे मोठा भाऊ?
महायुती-मविआत चर्चा सुरू, जागांवरून रस्सीखेच, कोण-कुठे मोठा भाऊ?.
गुडघे टेकायला लावणार की आयुष्यात पश्चाताप..,जरांगेंचा फडणवीसांना इशारा
गुडघे टेकायला लावणार की आयुष्यात पश्चाताप..,जरांगेंचा फडणवीसांना इशारा.
लालबाग राजाला २५ तासानंतर जड अंतःकरणाने निरोप, गिरगाव चौपाटीवर विसर्जन
लालबाग राजाला २५ तासानंतर जड अंतःकरणाने निरोप, गिरगाव चौपाटीवर विसर्जन.