ठाकरे-फडणवीस भेटीनंतर युतीच्या चर्चांना उधाण, सुधीर मुनगंटीवारांनी ऑफरही दिली, उद्धव ठाकरे काय म्हणाले?
राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असं म्हंटलं जातं. त्याचे कारण म्हणजे मागील तीन वर्षात झालेल्या घडमोडी बघता याबाबतचा विश्वास अधिक घट्ट झाला आहे. तशी चर्चा आता पुन्हा होत आहे.
मुंबई : राजकारणात काहीही होऊ शकतं असा पॅटर्न महाराष्ट्रात रुजू लागलाय. 2019 पासून ते आज पर्यंत या पॅटर्नची होत आहे. 2019 मध्ये राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आणि त्यानंतर कुणाचं सरकार येईल अशी चर्चा सुरू असतांना राष्ट्रवादीसोबत भाजपने सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडी स्थापन करत नवं सरकार आणण्यात आलं. त्यानंतर अडीच वर्षानंतर शिवसेनेत उभी फुट पडली आणि त्यानंतर राज्यात पुन्हा सत्तांतर झाले. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या चाळीस आमदारांनी सत्ता स्थापन केली. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकतं हा पॅटर्नची निर्माण झाला.
खरंतर राजकारणात काहीही होऊ शकतं असं अनेकदा बोललं जातं पण तसं होईलच याची शास्वती नसते. पण गेल्या तीन वर्षात झालेल्या घडामोडी पाहता राजकारणात काहीही शक्य आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही अशी स्थिती आहे.
त्यातच आज सकाळी विधिमंडळात प्रवेश करत असतांना सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस समोरा समोर आले होते. त्यामध्ये त्यांची चालता बोलता झालेली चर्चा चर्चेचा विषय ठरत असतांना सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेत निवेदन करत असतांना अप्रत्यक्षरित्या ऑफरच देऊन टाकली होती.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, साहेब आपल्याला झाड वाढवायचे आहे. त्याला खत द्यावे लागेल असं बोलत असतांना उद्धवजी तुम्ही अजूनही शांततेने विचार करा असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते.
त्यामुळे या दोन्ही बाबींवर काय भाष्य करतील अशी चर्चा असतांना त्यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया बघता मोठे संकेत दिले आहे. भविष्यात काही होऊ शकतं ? असा सवाल उपस्थित करत असतांना उद्धव ठाकरे यांनी अलीकडे बंद दाराआड चर्चा होतात.
आमची काही बंद दाराआड चर्चा झाली तर तुम्हाला कळवू. याशिवाय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फक्त हाय हॅलो चर्चा झाली. बाकी काहीही नाही. अशा खुल्या चर्चा आता होत नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र, उद्धव ठाकरे यांनी बंद दाराआड चर्चा झाली तर कळवू म्हंटल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
त्यामुळे आगामी काळात भाजपबरोबर उद्धव ठाकरे जाणार का? भाजप त्यांना बरोबर घेईल का ? अशा राजकीय चर्चा झाल्यास त्याची ही पहिली पायरी होती असं म्हणता येईल. आणि जर कदाचित भाजप आणि ठाकरे युती झाली तर राजकारणात काहीही होऊ शकतं हा पॅटर्न पुन्हा चर्चिला जाईल.