शिवसेनेत गट वैगरे काही नाही… शिवसेना एकच बाळासाहेबांची… संजय राऊत असं का म्हणाले ?
शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर आमचीच शिवसेना आहे असे दोन्ही गटाकडून सांगितले जात असतांना राऊत यांनी दिलेली प्रतिक्रिया अनेकांच्या भुवया उंचवणारी आहे.
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केली होती. यामध्ये तब्बल 102 दिवसांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. कारागृहाच्या बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांनी एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केले आहे. यावेळी माध्यम प्रतिक्रिया काही अंतरावर गेल्यानंतर प्रतिक्रिया देत आहे. यामध्येच माध्यम प्रतिनिधी यांनी संजय राऊत यांना प्रश्न करत असतांना ठाकरे गट असा उल्लेख केला होता. यामध्ये संजय राऊत यांनी लागलीच त्याला उत्तर देत गट बीट काहीही नाही शिवसेना एकच आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे असं उत्तर दिलं आहे. राऊत यांचे विधान खरंतर अनेकांच्या भुवया उंचवणारे आहे. त्याचे कारण म्हणजे संजय राऊत हे कारागृहात असतांना शिवसेनेत उभी फुट पडली होती. त्यानंतर अजूनही शिवसेना कुणाची याचा निकाल लागलेला नसतांना राऊत यांनी एक मोठं विधान केलं आहे.
कारागृहाच्या बाहेर आल्यानंतर महत्वाच्या विधानांपैकी संजय राऊत यांनी शिवसेना एकच असून ती बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असल्याचे म्हंटल्याने चर्चेला उधाण आले आहे.
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत हे तुरुंगात होते. याच दरम्यान शिवसेना कुणाची हा वाद न्यायालयात जाऊन पोचलेला असून त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही.
याच काळात मात्र अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर झाली होती, त्यामुळे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने नाव आणि चिन्ह दोन्ही गटाला वेगळे देण्यात आले होते.
यामध्ये ठाकरे गटाला मशाल चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असे नाव देण्यात आले होते, आणि शिंदे गटाला बाळसाहेबांची शिवसेना आणि ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आले आहे.
ही सर्व बाब राऊत यांना माहिती असेलच यामध्ये कुठलीही शंका नाही, विशेष म्हणजे एकच शिवसेना असल्याची प्रतिक्रिया देतांना ठाकरेंच्या गटात मशाल चिन्ह असलेले भगव्या रंगाचे पट्टी घेतलेली होती.
शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर आमचीच शिवसेना आहे असे दोन्ही गटाकडून सांगितले जात असतांना राऊत यांनी दिलेली प्रतिक्रिया अनेकांच्या भुवया उंचवणारी आहे.