उदयनराजेंच्या भावनांबद्दल संजय राऊत यांना काय वाटतं ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना नंतर…
उदयनराजे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सर्वत्र त्यांच्या भूमिकेला समर्थन केले जात असतांना अद्यापही भाजपकडून कुठलाही विरोध न झाल्याने राऊत यांनी घणाघात केला आहे.
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केले होते. वारंवार अवमान केल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सातारा येथून उदयनराजे यांनी रायगड गाठत निधारण शिवसन्मानाचा मेळावा घेत आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी उदयनराजे भोसले रायगड येथे जात असतांना असं वाटतंय मुंडकी छाटावी अशी प्रतिक्रिया दिली होती. शिवाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार अवमान करणारे विधान होत असल्याने संपूर्ण राज्यभर निदर्शने केली जात आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबद्दल ठिकठिकाणी विरोध दर्शविला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली त्यांच्या भावनेशी सहमत असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
यापूर्वी संजय राऊत यांनी म्हंटले होते की त्यांनी भाजपचा राजीनामा द्यावा. मात्र, आज त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना नंतर त्यांनी जागृती आणण्याचा प्रयत्न केला, त्यास पाठिंबा असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात अवमान करणारे विधान केल्याने उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहे.
त्यांच्या याच भूमिकेला ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी समर्थन देत शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्यांच्या संदर्भात उदयनराजे यांच्या भावनेशी मी सहभात असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे.
उदयनराजे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सर्वत्र त्यांच्या भूमिकेला समर्थन केले जात असतांना अद्यापही भाजपकडून कुठलाही विरोध न झाल्याने राऊत यांनी घणाघात केला आहे.
भाजपचे मंत्री, शिंदे गटाचे आमदार, राज्यपाल यांनी केलेल्या विधानाच्या संदर्भात सरकारवर निशाणा साधत उदयनराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.