Chhagan Bhujbal : शरद पवार यांनी दिलेल्या चिठ्ठीत काय लिहिलं?; छगन भुजबळ म्हणाले, परदे में रहने दो…

चाकणमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे एकाच मंचावर आले.

Chhagan Bhujbal : शरद पवार यांनी दिलेल्या चिठ्ठीत काय लिहिलं?; छगन भुजबळ म्हणाले, परदे में रहने दो...
छगन भुजबळ- शरद पवार
Follow us
| Updated on: Jan 06, 2025 | 3:12 PM

गेल्या आठवड्यात पुण्याच्या चाकणमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे एकाच मंचावर आले होते. त्यांच्या या भेटीची बरीच चर्चा रंगली. त्याच कार्यक्रमात शेजारी शेजारी बसलेले असताना शरद पवार यांनी भुजबळांना काहीतरी लिहून दिल्याचं दृश्य सर्वांना दिसलं. त्यांच्या या कृतीने सर्वांचच लक्ष वेधलं गेलं होतं.पवारांनी लिहीलेल्या आणि भुजबळांनी वाचलेल्या त्या कागदामध्ये असं काय लिहीलेलं होतं याची सर्वांनाच उत्सुकता होती.

आज छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधत अनेक विषयांवर मनमोकळेपणाने भूमिका मांडली. त्यावेळीच त्यांना त्या चिठ्ठीबद्दलही विचारण्यात आले. त्या दिवशी कार्यक्रमात शरद पवार यांनी तुम्हाला चिठ्ठी दिली, त्यात काय होतं असं प्रश्न भुजबळ यांना विचारण्यात आला होता. ” त्यावर काय लिहिलं ते सांगू? ते परदे मे रहने दो, पर्दा ना उठाओ ” असं म्हणत छगु भुजबळ मनसोक्त हसले आणिा त्यांनी मोठ्या खुबीने तो प्रश्न टोलावून लावला. पर्दा ना उठाओ, असं तुम्ही म्हणताय की पवारांनी त्या चिठ्ठीत तसं लिहीलं होतं, असा सवाल तरीही एकाने विचारलाच. त्यावरही भुजबळ म्हणाले., मी सांगितलं ना, उत्तर दिलं की आता, असं हसत हसत म्हणत त्यांनी तो विषय डावलला. पुण्यातील त्या कार्यक्रमात पवार-भुजबळ यांच्यात त्या चिठ्ठीतून नेमकं काय बोलणं झालं हे गुपित गुलदस्त्यातच राहिलं आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं, पण मंत्रीमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांना मात्र डावलण्यात आलं. त्यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज झाले. जहां नहीं चैना, वहाँ नहीं रहना असं म्हणत त्यांनी स्पष्टपणे त्यांची नाराजी बोलून दाखवली होती. तत्यानंतर काही दिवसांतच त्यांनी चाकणच्या सोहळ्याला जाता शरद पवार यांच्यासोबत एकाच गाडीत प्रवास केला. त्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तर शरद पवारांनी त्यांना रमंचावर चिठ्ठी लिहून दिल्यानेही अनेक चर्चांना ऊत आला. त्या चिठ्ठीत काय होतं हे आजही भुजबळांनी स्पष्टपणे सांगण्यास नकार दिल्याने लोकांची उत्सुकता वाढली असून भुजबळ आता पुढचं पाऊल काय उचलतात, ते शरद पवारांच्या पक्षात जाणार की भाजपात जाणार अशाही चर्चा सुरू आहेत.

धनंजय मुंडेंवर काय म्हणाले भुजबळ ?

बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जात आहे. पण फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं मी पूर्ण चौकशी करणार. चौकशीत कोण सापडले, आका काय, काका काय त्या सर्वांवर कारवाई करू. त्या आधी मुंडेंचा राजीनामा का मागत आहात? असा सवाल त्यांनी विचारला. जोपर्यंत चौकशीतून काही येत नाही. तोपर्यंत राजीनामा मागणं चुकीचं आहे. मला हे बरोबर वाटत नाही. साप साप म्हणत भुई धोपटणं योग्य नाही, असंही भुजबळांनी स्पष्ट केलं.

संजय गायकवाड यांना एकनाथ शिंदेंनी लगाम लावला पाहिजे

तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक झाला नाहीत, मला सालगडी केलंय का अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली होती. त्यावर भुजबळ यांनी आपलं मत मांडलं आहे. ‘ मतदाराबद्दल अजित पवार यांनी असं बोलायला नको होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व मतदारांना देशाचे मालक म्हणून अधिकार दिले आहेत, मतदार देशाचे मालकचं आहेत,’ असं भुजबळ यांनी यावेळी म्हटलं.

तर मतदारांबद्दल वाट्टेल बरळणाऱ्या संजय गायकवाडांवरही त्यांनी टीका केली. आमदार संजय गायकवाड यांचा जयपूर येथे दोन दिवसांपूर्वी एका सत्कार कार्यक्रम झाला. त्यावेळी बोलताना त्यांनी आपल्याला मतदान कमी मिळाले यामुळे खंत व्यक्त केली. जाहीर भाषणात आमदार गायकवाड हे मतदारांवर भडकले. त्यांनी मतदारांना शिवीगाळ केली, त्याच मुद्यावरून भुजबळ यांनी गायकवाडांवर टीका केली. ‘ एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांना लगाम लावली पाहिजे’, असं भुजबळ म्हणाले. ‘ माझ्याबाबतही त्यांनी असं म्हटलं होतं. छगन भुजबळांच्या कमरेत लात मारून मंत्रिमंडळातून बाहेर काढा, असं गायकवाड म्हणाले होते. अडीच महिने आधीच मी राजीनामा दिला होता. पण मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यामुळे मी त्यावर बोललो नव्हतो. पण गायकवाडांच्या स्टेटमेंटनंतर मी त्यांना म्हटलं मी आधीच राजीनामा दिला. त्यामुळे शिंदे यांनी गायकवाड यांना आवर घालावा’ असे भुजबळ यांनी नमूद केलं.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.