तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते, तुम्ही… एमपीएससीच्या पत्रिकेत झिंगाट प्रश्न; काय लिहावं ? परीक्षार्थी पेचात

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेल्या या प्रश्नाने अनेक विद्यार्थी गोंधळात पडले. परीक्षेतील प्रश्न अवघड की सोपे यापेक्षा परीक्षेत विचारण्यात आलेल्या दारूबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाचीच सध्या जास्त चर्चा आहे.

तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते, तुम्ही... एमपीएससीच्या पत्रिकेत झिंगाट प्रश्न; काय लिहावं ? परीक्षार्थी पेचात
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 11:36 AM

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जवळपास वर्षभराने पार पडली. मात्र या परीक्षेत विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांमुळे विद्यार्थी गोंधळात पडले असून सध्या इतर प्रश्न-उत्तरांपेक्षा या प्रश्नाचीच सध्या जास्त चर्चा सुरू आहे. रविवार, 1 डिसेंबर रोजी पार पडलेल्या या परीक्षेत नेमके काय प्रश्न विचारण्यात आले होते, ज्याची एवढी चर्चा सुरू आहे असा सवाल अनेकांच्या मनात सध्या आहे. या परीक्षेसाठी दोन पेपर उमेदवारांना सोडवावे लागतात. त्यापैकी पेपर दोन हा कलचाचणीचा पेपर असतो, त्यामध्ये काम करताना एखादा उमेदवार काय विचार करून निर्णय घेतो हे तपासण्यात येतं. त्याच पेपरमध्ये एक असा प्रश्न विचारण्यात आला होता की त्यावरून भावी अधिकाऱ्यांची विचारक्षमता नक्की कशी हवी आहे, त्यांनी नेमका काय, कसला विचार करणे अपेक्षित आहे असे प्रश्नच अनेकांना पडले आहेत.

एमपीएससीच्या परीक्षेत मद्यपानावर प्रश्न

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रविवारी ( 1 डिसेंबर) महाराष्ट्र राजपत्री नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. त्या परीक्षेत चक्क मद्यपानावर प्रश्न विचारण्यात आला होता. तो प्रश्न आणि त्याच्या उत्तरासाठी देण्यात आलेल्या पर्यायांची सध्या चर्चा सुरू आहे.

काय होता तो प्रश्न ?

तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहेत. जर तुम्हाला त्यांच्या सोबत जायचे नसेल आणि त्यांच्या अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयीपासून स्वतःला बाहेर ठेवायचे असेल तर तुम्ही काय कराल ? असा प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आला होता.

आणि पर्याय म्हणून..

1) मी माझ्या मित्रांना सांगेन की माझ्या पालकांना मला दारू पिण्यास मनाई केली आहे.

2) दारू पिण्यास नकार देईन.

3) फक्त तुमचे मित्र मद्यपान करत आहेत म्हणून मद्यपान करेन.

4) नकार देईन आणि त्यांना खोटे सांगेन की तुम्हाला यकृताचा आजार आहे.

हा प्रश्न आणि त्याच्यासाठी देण्यात आलेल्या पर्यायांनी विद्यार्थ्यांना गोंधळात टाकलं. ही परीक्षा उत्तीर्ण होणारे भविष्यातील शासनाचे क्लास वन अधिकारी असतील. त्यामुळे या परीक्षेत दारूसंबंधी प्रश्न विचारायला नको होता. हा प्रश्न विचारण्याचे प्रयोजन काय ? असा सवाल सध्या विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे. अशा प्रश्नांची खरच गरज आहे का असा प्रश्नही लोक विचारत आहेत.समाज माध्यमांवर देखील या प्रश्नाची चर्चा सुरु असल्याचे पहायला मिळत्ये. एमपीएससीच्या कार्यपद्धतीवरही टीका होत आहे.

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.