शिंदे साहेब खोके पाठवायचे तेव्हा… शिंदे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट, ठाकरे, राऊत यांच्यावर थेट आरोप

शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे यांना 1 कोटी रुपये दिल्याचा आरोप केला होता. त्यापाठोपाठ आता संजय गायकवाड यांनीही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर मोठा आरोप केलाय.

शिंदे साहेब खोके पाठवायचे तेव्हा... शिंदे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट, ठाकरे, राऊत यांच्यावर थेट आरोप
EKNATH SHINDEImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 6:19 PM

बुलढाणा | 11 फेब्रुवारी 2024 : शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीय. मुख्यमंत्री फेकूचंद आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली. राऊत यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतानाच शिंदे गटाचे संजय गायकवाड यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. याआधी शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे यांना 1 कोटी रुपये दिल्याचा आरोप केला होता. त्यापाठोपाठ आता संजय गायकवाड यांनीही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर मोठा आरोप केलाय.

संजय राऊत म्हणतात मुख्यमंत्री फेकुचंद आहेत. परंतु, सगळं राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम पाहत आहे. त्यामुळे ते फेकुचंद आहेत की ठणकचंद आहेत हे राज्याला माहित आहे. मुख्यमंत्री शिंदे हे ठणकावून काम करत आहेत. भाजपचेही आमदार म्हणतात की असे काम कधी झाले नाही. आमची चोरांची टोळी नाही तर लोकांनी लोकशाहीतून निवडून देणाऱ्या आमदारांची टोळी आहे असे आमदार गायकवाड म्हणाले.

आम्ही जनमतामधून निवडून आलेले आहोत. जेलमधून नाही. जे जेलमधून आले त्यांच्यासोबत तुम्ही जाऊन बसले. संजय राऊत याला चोरातला आणि लोकशाहीमधला फरक समजत नाही अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री यांच्यासोबत गुंड असल्याचे राऊत म्हणत आहेत. पण, त्या xxव्याला जेव्हा शिंदे साहेब उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते तेव्हा हे फोटो दिसले नाही का? तेव्हा शिंदे साहेब खोके पाठवायचे तेव्हा ही गुंडगिरी गोड वाटत होती का असा जळजळीत सवाल केला. तुमचे कोणाकोणासोबत संबंध आहेत हे लवकरच उघड करेन असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मुलायमसिंग सारख्या हरामखोर सोबत तुम्ही युती केली. त्याची लाज शरम राहू द्या. जे काही होते ते घरातले भांडण होते. गुंडगिरी, गँगवार म्हणता? पण, घडणारी घटना काही सांगून होते का? आरोप करताना तरी लाज ठेवा. आणखी फोटो समोर आणेन म्हणता. जे काही समोर आणायचे असेल ते आणा. एखाद्या कार्यक्रमात जातात तर कुणीही फोटो काढतो. त्याच्या कपाळावर लिहिलेले असते का की ‘मै चोर हु, मैं गुंडा हुं’. कुणाच्या तोंडावर लिहिलेले नसते असा पलटवार आमदार गायकवाड यांनी केला.

खासदार सुप्रिया सुळे म्हणतात मी शरद पवारांची मुलगी. निश्चितच त्या त्यांच्या सुपुत्री आहेत आणि गुणवान आहेत. त्यांनी त्यांच्या नावाने पुन्हा विश्व उभे करावं. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत असा टोलाही त्यांनी लगावला. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करून राज्यात आणखी कामे त्यांच्या हातून व्हावी यासाठी प्रत्येकजण कामाला लागला आहे असेही त्यांनी सांगितले.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.