अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस यांना आठवली ‘अमृता’, म्हणाले, सावधानतेने…
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांसाठी 36 हजार कोटीहून अधिकची तरतूद करण्यात आली आहे. अमृत काळातील राज्याचा हा पहिला अर्थसंकल्प पाच ध्येयांवर आधारित आहे. पंचामृत असा हा अर्थसंकल्प आहे.
मुंबई : राज्याचा 2023 – 24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस म्हणाले. ‘अर्थमंत्री म्हणून माझा आणि महाराष्ट्राच्या अमृत काळातील हा पहिला अर्थसंकल्प लोकशाहीच्या सर्वोच्च व्यासपीठावर सादर करताना मला अत्यंत आनंद होतो आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाचे हे तीनशे पन्नासावे वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील स्वराज्याचे निर्मिती करण्यासाठी शासनाची पुढील वाटचाल असेल, असे ते म्हणाले.
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांसाठी 36 हजार कोटीहून अधिकची तरतूद करण्यात आली आहे. अमृत काळातील राज्याचा हा पहिला अर्थसंकल्प पाच ध्येयांवर आधारित आहे. पंचामृत असा हा अर्थसंकल्प आहे.
पहिली अमृत योजना शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी, दुसरी अमृत योजना महिला आदिवासी मागासवर्ग ओबीसीसह सर्व समाज घटकांसाठी, तिसरी अमृत योजना भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, चौथी अमृत योजना रोजगार निर्मिती, सक्षम कुशल, रोजगारक्षम युवा आणि पाचवी अमृत योजना पर्यावरण पूरक विकासाकडे नेणारी आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी या पंचअमृत योजना वाचताना त्या प्रत्येक योजनेच्या अनुषंगाने त्यातील प्रमुख मुद्दे सांगितले. हे मुद्दे मांडत असताना अधूनमधून ते विरोधकांकडे पाहून मिशीला टिप्पणीही करत होते. फडणवीस यांनी चार अमृत योजना सादर केल्यानंतर ते म्हणाले आता मी पाचव्या अमृताकडे वळतो.
त्याच्या या विधानामुळे सभागृहात हलका हास्य फवारा फुटला. आपल्याकडून काय नेमकं असे विधान गेलं की ज्यामुळे सदस्य हसत आहेत याचा क्षणभर विचार केला. झाली चूक त्यांच्या लक्षात आली.
मी पंचम अमृताकडे वळतो. अमृता म्हणताना मला सावधानतेने बोलावे लागते. कारण, अमृताकडे वळतो म्हटल्यावर तुम्ही भलतीकडे जाल असे सांगत लगेच त्यांनी बाजू सावरून घेतली. हे सांगताना देवेंद्र यांनाही हसू आवरले नाही आणि त्यानंतर मग सभागृहात एकच हास्याचा फवारा फुटला.