Sanjay Rathod Poharadevi: 15 दिवस तुम्ही कुठे होतात; संजय राठोड म्हणाले…

माझ्या घरी माझे वृद्ध आई-वडील, पत्नी, मुलंबाळं आहेत. माझ्या पत्नीला रक्तदाबाचा त्रास आहे. या सगळ्यांना सांभाळण्याचं काम मी दहा दिवस करत होतो. | Sanjay Rathod

Sanjay Rathod Poharadevi: 15 दिवस तुम्ही कुठे होतात; संजय राठोड म्हणाले...
संजय राठोड हे बुधवारी नागपुरात दाखल झाल्यानंतर याचा प्रत्यय आला. यावेळी विमानतळावर एकही शिवसैनिक हजर नव्हता.
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 3:09 PM

वाशिम: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर आरोपांच्या फैरी झाडल्या असताना संजय राठोड (Sanjay Rathod) नेमके कुठे होते, या प्रश्नाचा अखेर उलगडा झाला आहे. मी 14 दिवस नव्हे तर फक्त 10 दिवस गायब होतो. त्या काळातही मी शासकीय काम करत होतो, असे संजय राठोड यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. (Sanjay Rathod press conference in Mumbai)

ते मंगळवारी पोहरादेवी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी आरोप होत असतानाही आपण इतके दिवस प्रसारमाध्यमांसमोर का आलो नाही, याचा खुलासा केला. गेल्या 15 दिवसांपासून प्रसारमाध्यमांवर माझ्याविषयी बातम्या दाखवल्या जात होत्या. माझ्या घरी माझे वृद्ध आई-वडील, पत्नी, मुलंबाळं आहेत. माझ्या पत्नीला रक्तदाबाचा त्रास आहे. या सगळ्यांना सांभाळण्याचं काम मी दहा दिवस करत होतो, असे राठोड यांनी सांगितले.

गेल्या 15 दिवसांपासून प्रसारमाध्यमांकडून संजय राठोड यांचा शोध घेतला जात होता. मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यास ते नॉट रिचेबल येत होते. तर 13 फेब्रुवारीला संजय राठोड यांची गाडी मंत्रालयाच्या पार्किंगमध्ये आढळून आली. त्यामुळे संजय राठोड नेमके गेले तरी कुठे, हा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र, आता त्यांनीच या सगळ्याचा खुलासा केला आहे.

पूजा चव्हाणबद्दल राठोड काय म्हणाले?

पूजा चव्हाण या गौर बंजारा समाजातील तरुणीचा पुण्यात दुर्देवी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूबाबत मला दु:ख आहे. चव्हाण परिवाराच्या दु:खात माझा समाज आणि कुटुंब सहभागी आहे. पूजा चव्हाण प्रकरणावरून महाराष्ट्रात घाणेरडं राजकारण सुरू आहे. ते चुकीचं आहे, मला आणि माझ्या कुटुंबीयांना उद्ध्वस्त करणारं हे राजकारण आहे, असा दावा संजय राठोड यांनी केला.

एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभं करू नका; संजय राठोड यांची हात जोडून विनंती

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांकडून झालेले आरोप आणि 15 दिवसाच्या अज्ञातवासानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी मौन सोडलं. राठोड यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. पूजा चव्हाण प्रकरणात माझी आणि माझ्या समाजाची बदनामी केली जात आहे. पूजा चव्हाण पण आत्महत्या प्रकरणी घाणेरडं राजकारण सुरू आहे, असं सांगतानाच एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभं करू नका, अशी कळकळीची विनंतीच संजय राठोड यांनी हातजोडून केली.

संबंधित बातम्या 

Sanjay Rathod Pohradevi visit LIVE | संजय राठोड पोहरादेवी गडावर, समर्थकांची प्रचंड गर्दी

पूजा आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हती, तिचे आईवडील गप्प का?; चुलत आजीचे सवाल

‘पोहरादेवी गडावर संजय राठोडांनी आपल्या कृत्याची कबुली द्यावी’

(Sanjay Rathod press conference in Mumbai)

Non Stop LIVE Update
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.