वडिलांना कॉंग्रेस कडून उमेदवारी जाहीर मुलगा साईबाबांच्या दर्शनाला, सत्यजित तांबे भाजपाची वाट धरणार?
शिर्डी येथे सत्यजित तांबे साई दर्शनाला आले, अचानक येऊन सत्यजित तांबे यांनी साईबाबांचे दर्शन घेऊन काय साकडं घातलं याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
शिर्डी : नाशिक पदवीधर मतदार संघातून सलग तीन वेळा निवडून आलेल्या डॉ. सुधीर तांबे यांना कॉंग्रेसकडून चौथ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. याच दरम्यान डॉ. सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांच्या भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चा सुरू आहे. त्यातच सत्यजित तांबे हे साई बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत गेले होते. नेहमी माध्यमांशी बोलणाऱ्या सत्यजित तांबे यांनी माध्यमांशी बोलणं तर सोडाच साधे चित्रीकरणाला देखील विरोध केला होता. एकीकडे वडिलांना उमेदवारी जाहीर झालेली असतांना मुलाने प्रतिक्रिया न दिल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. काही महिन्यांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात सत्यजित तांबे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपात येण्याची खुली ऑफर दिली होती. त्यावरुनच पदवीधर मतदार संघात भाजपकडून सत्यजित तांबे यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे. अशातच आज कॉंग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
एकीकडे वडील डॉ. सुधीर तांबे यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली आहे, नाशिकच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. सुधीर तांबे असणार आहे.
तर दुसरींकडे भाजपाकडून मुलगा सत्यजित तांबे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असून तशी जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.
शिर्डी येथे सत्यजित तांबे साई दर्शनाला आले, अचानक येऊन सत्यजित तांबे यांनी साईबाबांचे दर्शन घेऊन काय साकडं घातलं याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
नेहमी माध्यमांशी मनसोक्त बोलणारे सत्यजित तांबे यावेळी बोलण्यास काय साधे चित्रीकरण करण्यास सत्यजित तांबे यांनी नकार दिला आहे.
त्यामुळे सत्यजित तांबे भाजपात जाण्यासाठी आग्रही होते का? वडिलांच्या पुढे मुलाला माघार घ्यावी लागली आहे का? इतकंच काय मुलाची आणि वडिलांची सरळ लढत तर होणार नाही ना? अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू आहे.
सत्यजित तांबे हे कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकर्णीतील अभ्यासू युवा नेता आहे. थेट राहुल गांधी यांच्याशी त्यांची जवळीक आहे. माजी मंत्री असलेल्या बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. आणि सलग तीन वेळा आमदार असलेल्या डॉ. सुधीर तांबे यांचे ते चिरंजीव आहे.