Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धारावी झोपडपट्टीतील कोरोना संसर्गावर नियंत्रण, WHO कडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक

दिवसेंदिवस देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत (Corona Patient Dharavi) आहे.

धारावी झोपडपट्टीतील कोरोना संसर्गावर नियंत्रण, WHO कडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक
Follow us
| Updated on: Jul 11, 2020 | 8:16 AM

दिल्ली : दिवसेंदिवस देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत (Corona Patient Dharavi) आहे. मुंबईतही कोरोनाच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत धारावीमधील झोपडपट्टीत कोरोनावर नियंत्रण मिळवल्याबद्दल WHO ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले (Corona Patient Dharavi) आहे.

“धारावी एक उदाहरण आहे की ज्यामध्ये कोरोनाने शिरकाव केला आणि सरकारने त्यावर नियंत्रण मिळविले”, असा कौतुकाचा वर्षाव वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमुख टेड्रोस अडॅनॉम गेब्रेयसिस यांनी केला आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

मुंबईतील धारावी झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती. येथे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरला होता. त्यामुळे दिवसाला मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत होते. पण मुंबई महापालिकेने येथील कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवले आहे.

धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर धारावीत कोरोनाने हातपाय पसरायला सुरु केले. धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. त्यामुळे कोरोनाला आवरणं कठीण होईल की काय याची भीती होती. गेल्या महिन्यात धारावीत दिवसाला 80 ते 90 रुग्ण आढळले होते.

त्यामुळे धारावीत कोरोनाला आवरणं कठीण झालं होतं. अगदी दाटीवाटीचा परिसर असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळणं कठीण झालं होतं. त्यानंतर पालिकेने धारावीकडे विशेष लक्ष देत अनेक उपाययोजना करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता धारावीतील आकडे कमी झाल्याचा दावा प्रशासन करत आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीसाठी गुडन्यूज, रुग्णवाढीच्या वेगात कमालीची घट

Mission Zero | कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुंबई महापालिकेचा नवा अ‍ॅक्शन प्लॅन, मिशन झिरो मोहिम नेमकी काय?

Special Report | कोरोना नियंत्रणाचा नवा ‘धारावी पॅटर्न’

पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने.
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन.
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.