“नाना पटोले यांना विचारतो कोण?” काँग्रेसमध्ये पुन्हा दुफळी ? काय म्हणाला ‘हा’ नेता ?

| Updated on: Mar 10, 2023 | 5:59 PM

विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकजूट दाखवून नागपूर, अमरावती, औरंगाबाद, चिंचवड या जागा जिंकल्या. हीच एकजूट कायम दाखविली तर आगामी निवडणुकीत अधिक जागा जिंकू असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे. मात्र,

नाना पटोले यांना विचारतो कोण? काँग्रेसमध्ये पुन्हा दुफळी ? काय म्हणाला हा नेता ?
CONGRESS NANA PATOLE
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

मुंबई : नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद उफाळून आला होता. कॉंग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना निवडणुकीसाठी एबी फॉर्म दिला. त्यांनी आपला मुलगा सत्यजित तांबे यांच्यासाठी आपली उमेदवारी मागे घेतली. तर, सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून काँग्रेसला हात दाखविला. महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र, यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात नाराज झाले होते. यामुळे काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे दिसून आले होते.

दिल्लीच्या हायकमांडने वरिष्ठ निरीक्षक यांना महाराष्ट्रात पाठवून नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात दिलजमाई घडवून आणली. त्यापाठोपाठ झालेल्या चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढवून कसबा जागा जिंकली. मात्र, चिंचवड येथे झालेली बंडखोरी रोखण्यात अपयश आल्याने ही जागा भाजपकडे आली.

हे सुद्धा वाचा

परंतु, विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकजूट दाखवून नागपूर, अमरावती, औरंगाबाद, चिंचवड या जागा जिंकल्या. हीच एकजूट कायम दाखविली तर आगामी निवडणुकीत अधिक जागा जिंकू असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे. मात्र, त्यासाठी काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटले पाहिजेत असे यातील काही नेत्यांना वाटत आहे.

काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद शमला असे वाटत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. आज विधानभवनात काँग्रेसच्या काही माजी मंत्री आणि पदाधिकाऱ्यांशी बोलताना ही बाब प्रकर्षाने समोर आली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी निवडणूका महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढणार असल्यावर आमचे एकमत झाले आहे, असे सांगितले.

प्रदेश प्रवक्ते राजू वाघमारे यांनीही महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना असे तिन्ही पक्ष एकमेकांसोबत आहोत. या निवडणुकीत जनता भाजप आणि शिवसेनेला मतदानाद्वारेच उत्तर देईल. पक्षात काही वादविवाद होत असतात पण ते तात्पुरते असतात. योग्य वेळी ते सोडवले जातात आणि पुन्हा एकदिलाने काम करतो असे सांगितले.

मात्र, कॉंग्रेसचे एक माजी मंत्री यांनी थेट नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र निवडणुकांना सामोरे जाणारा आहोत. कुणाची काही वेगळी भूमिका असली तरी पक्ष म्हणून आम्ही सोबत राहू. पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष यांच्यापेक्षा एकत्रित विचार महत्वाचा मानला जातो, असे सांगत अप्रत्यक्षपणे नाना पटोले यांनाच टोला लगावला.