मनोज जरांगे यांना अंतरवलीत पुन्हा कुणी आणून बसवलं?; छगन भुजबळ यांचा सर्वात मोठा आरोप काय?

लासलगाव विंचूरमध्ये भूमिपूजन आहे. आपण दोन रस्ते मंजूर करून घेतले आहेत. पिंपळस ते येवला चार पदरी रस्ता करीत आहोत. चार ते पाच वर्षांपासून प्रयत्न करत होतो. अशोक चव्हाण तेव्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. 134 कोटींचा आणखी एक मार्ग बांधत आहोत,त्या ठिकाणी अनेक तक्रारी आल्यामुळे आपण हा रस्ता हाती घेतला. शिर्डी ,संभाजीनगर जाण्यासाठी त्याचा फायदा होईल अनेक शेतकऱ्यांना फायदा होईल असेही भुजबळ यांनी म्हटले आहे

मनोज जरांगे यांना अंतरवलीत पुन्हा कुणी आणून बसवलं?; छगन भुजबळ यांचा सर्वात मोठा आरोप काय?
Follow us
| Updated on: Sep 14, 2024 | 3:45 PM

आंतरवाली सराटीत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची हाक दिली आहे. 16 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजता या उपोषणाची सुरुवात होणार आहे. कारण 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. या दिनाचे औचित्यसाधून या मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत. मात्र, मनोज जरांगे यांना हिरो करण्यात कोणाचा हात आहे या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी खळबळजनक आरोप केला आहे.

आंतरवाली सराटीत जेव्हा मनोज जरांगे यांच्यासह गावकऱ्यांवर लाठीमार झाला तेव्हा त्यानंतर सुरुवातीला दगडफेक झाली होती. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरांगे तिथून निघून गेला होता. परंतू त्यावेळी राष्ट्रवादीचे दोन आमदार, एक स्थानिक आमदार आणि राजेश टोपे या दोघांनी मनोज जरांगे यांना तिथे परत आणून बसवलं असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यानंतर घटनास्थळावर पवार साहेबांना तिथे भेट दिली. साहेब गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले. खरी परिस्थिती जी आहे त्याची दोघांना कल्पना नव्हती. पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना इथे पोलिसांवरच मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याचे माहिती नव्हते. अनेक महिला पोलीस कर्मचारी दवाखान्यात दाखल झाले होते असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

काल केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी केंद्र शासनाचा निर्णय चांगला असल्याचे म्हटले आहे आणि त्याचे स्वागतही केले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारी आपला कांदा खरेदी करणारे आहेत. आपली निर्यात मोठ्या प्रमाणावर थांबली होती. मोदी साहेबांची जेव्हा नाशिकला जाहीर सभा झाली तेव्हा, मी मीटिंगमध्ये होतो. त्या वेळेला सुद्धा मी त्यांच्याकडे मागणी केली भाजपाकडूनही मागणी झाली. पियुष गोयल यांनी देखील मागणी केली सर्वांनी प्रयत्न केले त्यांच्या या प्रयत्नाला यश आले.निर्यात मूल्य शून्यावर आले आहे, निर्यात शुल्क अर्धे कमी झाले आहे, 20 टक्क्यावर आले आहे. इतर देशातील व्यापाऱ्यांबरोबर आपले व्यापारी स्पर्धेत उतरतील मोठ्या प्रमाणात एक्स्पोर्ट होईल, शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल दोन पैसे अधिक मिळतील असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.