पवार कुटुंबात अंतिम शब्द कोणाचा? शरद पवार नाही तर सुप्रिया सुळेंनी सांगितलं या व्यक्तीचं नाव

मुंबईच्या वाय बी चव्हाण सेंटरमध्ये 15 व्या राज्यस्थरीय शिक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिक्षण परिषदेमध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी  शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध मुद्दे उपस्थित केले.

पवार कुटुंबात अंतिम शब्द कोणाचा? शरद पवार नाही तर सुप्रिया सुळेंनी सांगितलं या व्यक्तीचं नाव
Follow us
| Updated on: Jan 05, 2025 | 3:48 PM

निवृत्ती बाबर, प्रतिनिधी : मुंबईच्या वाय बी चव्हाण सेंटरमध्ये 15 व्या राज्यस्थरीय शिक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिक्षण परिषदेमध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी  शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध मुद्दे उपस्थित केले,  तसेच त्यांच्या खास शैलीमध्ये जोरदार फटकेबाजी केल्याचं देखील पाहायला मिळालं.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?  

शिक्षणाच्या बाबतीत अनेक बदल होतात आणि त्यावर चर्चा देखील होत आहे. प्रकाशजी जावडेकर आणि माझे मतभेद आहेत, परंतु शिक्षण क्षेत्राशी संबंधी आमचं एक मत आहे.  मराठी भाषेवर आपण प्रेम केलं पाहिजे, हे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजेत. आर आर पाटील सोडले तर राजकारणात कोणत्याही नेत्याची मुलं सरकारी शाळेत गेलेली नाहीयेत, मी पण मराठी शाळेत गेले नाही, पवार कुटुंबात कॉन्व्हेंटमध्ये जाणारं पहिलं मूल म्हणजे मी असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, माझ्या वडिलांना फार वाटत होतं की, मी मराठी शाळेत शिकावं परंतु आईच्या आग्रहामुळे मी कॉन्व्हेंट मध्ये शिकले. घरात बऱ्याच गोष्टींमध्ये आईचं चालतं तो भाग वेगळा. बाहेर ते शरद पवार आहेत,  पण घरात ते नवरा आहेत आता याची हेडलाईन करू नका नाहीतर घरी जाऊन मला जोडे बसतील, अशी मिष्कील टिपणीही यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली.

यशस्वी झाल्यावर नापास झालेल्या मुलांची कथा फार चांगली वाटते.  कुठलंही मूल धन असतं या मताची मी आहे. मला दोन मुलं आहेत ते वाढवताना एवढा त्रास होतो परंतु शिक्षक चाळीस मुलांना सांभाळतात. त्या मुलांची आयक्यू लेव्हल वेगवेगळी असते, तरीही ते त्यांना सांभाळतात हे विशेष. तंत्रज्ञान येतं ते आत्मसात करावं या मताची मी आहे, मला पण आवडतं परंतु पहिल्यांदा मला तंत्रज्ञानाची भीती वाटत होती. चॅट जीपीटीची भीती वाटते, जीपीटीच्या माध्यमातून पोर गृहपाठ करायला लागली तर मेंदूचं आकलन कसं होईल हा खूप गंभीर विषय आहे, तंत्रज्ञानामुळे केवळ शिक्षकांची नोकरी जाणार नाही, कारण शिक्षक ही नोकरी नाहीये तर ती सेवा आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.