माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्याची आयडिया नक्की कोणाची? देवेंद्र फडणवीसांनी घेतलं ‘या’ व्यक्तीचं नाव, म्हणाले….
ही योजना सुरु करण्याची आयडिया नेमकी कोणची, याचे क्रेडिट नक्की कोणाचं याबद्दल आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च याबद्दलची माहिती दिली आहे.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. सध्या या योजनेची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. असंख्य महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र ही योजना सुरु करण्याची आयडिया नेमकी कोणची, याचे श्रेय नक्की कोणाचं याबद्दल आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च याबद्दलची माहिती दिली आहे.
‘टीव्ही 9 मराठी’चा एक कॉन्क्लेव्ह कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिले. यावेळी मध्यप्रदेशात शिवराज चौहान यांच्या सरकारने मेरी लाडली बेहना अशी योजना सुरु केली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात ही योजना सुरु करण्यात आली. पण महाराष्ट्रात ही योजना सुरु करण्याची संकल्पना नेमकी कोणी सुचवली? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी जाहीरपणे उत्तर दिले.
“सीएमच्या बैठकीत तिघांची बैठक झाली. शिवराज सिंह चौहान यांनी माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले, आपण अशी योजना सुरू करावी. श्रेयवादाची लढाई नाही. अधिकार हे मुख्यमंत्र्यांचेच असतात. मुख्यमंत्र्यांनी मला अधिकार दिले म्हणून उपमुख्यमंत्री आहे. सरकारच्या योजनेचं श्रेय मुख्यमंत्र्यांचं असतं. पण त्याहीपेक्षा अधिक मोठं श्रेय लाडक्या बहिणीचं आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ब्रँडिंग एकत्र झालं पाहिजे एवढंच
“लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. तिन्ही पक्ष एकत्र आहे. तेव्हा ब्रँडिंगचं माध्यम आहे. ब्रँडिंग एकत्र झालं पाहिजे एवढंच. लाडकी बहीणला जास्त फोकस मिळत आहे. त्यात इन्व्हॉल्मेंट अधिक आहे. ५० टक्के महिला त्यात आल्या, त्यामुळे त्याच्यावर फोकस अधिक आहे. आम्ही इतर योजनाही सुरू केल्या आहेत”, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
शेतकऱ्यांना एक रुपयात पिकविमा योजनाही सुरु
“शेतकऱ्यांना एक रुपयात पिकविमा योजना आणली आहे. दीड हजार कोटी आम्ही शेतकऱ्यांना दिले आहे. कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये देत आहोत. दूध उत्पादकांनाही सात रुपये देत आहोत. हे महत्त्वाचं काम आम्ही करत आहोत. शेतकऱ्यांना दिवसा वीज देत आहोत. केवळ दीड वर्षात १२ हजार मेगावॅटचं काम सुरू केलं. ते १८ महिन्यात पूर्ण करू. १६ हजार मेगावॅट वीज देण्याचं काम करू”, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.