विशाळगडावरच्या हिंसाचारामागे कोण? राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु

| Updated on: Jul 15, 2024 | 9:26 PM

विशाळगडाच्या अतिक्रमण हटाव आंदोलनाला गालबोल लागलं. काल याठिकाणी तोडफोड आणि जाळपोळही झाली. त्यावरुन आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

विशाळगडावरच्या हिंसाचारामागे कोण? राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु
Follow us on

अतिक्रमण हटवण्याच्या आंदोलनावेळी विशाळगड किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारावरुन वाद सुरु झालाय. आंदोलनाची कल्पना असूनही सरकार आणि यंत्रणेला हिंसाचार रोखता आला नाही म्हणून खासदार शाहू महाराजांनी सरकारवर टीका केली आहे, तर दुसरीकडे
पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि संभाजीराजे यांच्यात शा‍ब्दिक चकमक रंगली आहे. किल्ल्यांवरच्या अतिक्रमणाचा मुद्दा अनेक दिवसांपासून गाजतो आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी काल संभाजीराजे साडे 12 च्या दरम्यान विशाळगडाच्या पायथ्याजवळ पोहोचले. मात्र त्याच्या काही तासांआधीच काही जण वरच्या भागात पोहोचले होते. आणि त्यांनी संभाजीराजे पोहोचण्याआधीच तोडफोड आणि जाळपोळही केली.

या वादानंतर प्रशासनानं संभाजीराजेंना किल्ल्याच्या पायथ्याशीच रोखलं. अखेर अतिक्रमण तातडीनं हटवण्याच्या शब्द दिल्यानंतर संभाजीराजेंनी आंदोलन मागे घेतलं. मात्र त्यादरम्यान विशाळगडावर कायदा हाती घेण्याचा प्रय़त्न कुणी केला., यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

प्रकाश आंबेडकरांची टीका

विशाळगडावर अतिक्रम झालेलं आहे ते काढण्यासाठी नियम असतात. त्या ठिकाणी जे घडलं भीडे यांच्या धारकऱ्यांनी धुडगूस घातला अशी आमची माहिती आहे. जाणून बुजून त्या ठिकाणी लोकांना मारहाण करण्यात आली. सरकारने यांची चौकशी करावी त्यावर तोडगा काढावा अशी आमची विनंती आहे.

विशाळ गडावर झालेल्या घटनेनंतर संभाजी राजे यांच्यासह इतर ५०० हून अधिक शिवभक्तांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. आज संभाजी राजे यासाठी पोलीस स्टेशनला पोहोचले होते. संभाजी राजे म्हणाले की,  गुन्हा दाखल झाल्याचं कळल्याने मी पोलीस स्टेशनला हजर झालो आहे. मी पोलिसांना प्रश्न केला की, ज्या शिवभक्तांवर गुन्हा दाखल केलाय. त्यांना जबाबदार धरण्यापेक्षा मला जबाबदार ठरवा. माझ्यावर गुन्हा दाखल करा. पण त्यांना गुन्हा दाखल केल्या का याबाबत काहीही उत्तर दिले नाही.


‘याला जातीय रंग दिला जात असल्याचं देखील संभाजी राजे म्हणाले. हा वाद हिंदू मुस्लमान असा नाही आहे. कारण पहिल्या ज्या व्यक्तीचं अतिक्रमण काढलंय तो हिंदू व्यक्ती आहेत. पाटील असं त्यांचं नाव आहे.’