राष्ट्रवादीने काळं फासलं ते नामदेव जाधव नेमके कोण आहेत ? का आहेत चर्चेत

पुणे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नामदेवराव जाधव यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. सध्या सत्ताधारी भाजपाला हवीशी भूमिका घेतल्याने ते चर्चेत आले आहेत. पाहा नामदेव जाधव नेमके कोण आहेत.

राष्ट्रवादीने काळं फासलं ते नामदेव जाधव नेमके कोण आहेत ? का आहेत चर्चेत
namdeo-jadhav Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 6:19 PM

मुंबई | 18 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने काळं फासलं ते नामदेव जाधव नेमके कोण आहेत ? राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टिका केल्यानंतर ते चर्चेत आले आहेत. नामदेवराव जाधव युट्युबवर प्रचंड प्रसिद्ध आहेत. त्यांचे अनेक व्हिडीओ युट्युबवर अपलोड केलेले आढळतील. नामदेवराव जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ‘शिवाजी द मॅनेजमेंट गुरु’ हे पुस्तक लिहील्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांचे अनेक मोटिव्हेशनल व्हिडीओ युट्युबवर पाहीले जातात. तर त्यांच्याबद्दल चला जाणून घेऊया अधिक माहीती …

पुणे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नामदेवराव जाधव यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.  मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवार अशी जहरी टिका करणाऱ्या त्यांच्या नावाच्या पोस्ट आणि फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. नामदेवराव सध्या भाजपाशी संबंधित नेत्यांसोबत छायाचित्रात दिसत असतात. मात्र त्यांचे शरद पवार यांच्या सोबतचेही फोटो सध्या व्हायरल होत आहेत. त्यामुळे नामदेवराव जाधव यांच्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. नामदेवराव जाधव यांचा पेशा काय ? ते नेमके काय करतात याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

मोटिव्हेशनल स्पिकर्स म्हणून नामदेव जाधव फेमस आहेत, याआधी त्यांनी आपली सुरुवात लेखक म्हणून केली होती. त्यांनी सर्वात आधी ‘शिवाजी द मॅनेजमेंट गुरु’ हे पुस्तक लिहिल्याने ते प्रसिद्धीच्या झोतात आले. या पुस्तकाचा खप वाढल्यानंतर त्यांची लेखक म्हणून अन्य पुस्तके आली. त्यानंतर त्यांनी तरुणा मोटिव्हेशनल करण्यासाठी व्याख्यानं द्यायला सुरुवात केली. त्यांच्याकडील रसाळ वाणीमुळे आणि साध्या सोप्या शब्दात लोकांना आवडेल अशा सोप्या भाषेतील त्यांच्या भाषणांनी ते युट्युबवर ते प्रचंड प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी मध्यंतरी त्यांनी मटण घेण्याऐवजी माझी पुस्तकं वाचा अशी पोस्ट फेसबुकवर केल्याने मासांहारी प्रचंड नाराज झाले होते.

नामदेवराव जिजाऊंचे वंशज ?

नामदेवराव यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात झाला. शिक्षणासाठी ते मुंबईत आले. पुढे त्यांना सरकारी नोकरी मिळाली. परंतू सरकारी नोकरीत मन लागेना म्हणून त्यांनी नोकरी सोडली. पूर्ण वेळ व्यवसाय करायचे असे ठरविले. त्यावेळी त्यांना ते जिजाऊंचे वंशज असल्याचे कळल्याचे म्हटले जाते. यावरुन ते जिजाऊ यांचे वंशजच नसल्याची टिकाही त्यांच्यावर करण्यात आली आहे. त्यानंतर लेखणाकडे वळले. त्यांनी ‘शिवाजी द मॅनेजमेंट गुरु’ पुस्तक लिहील्यानंतर ते व्याख्याने देऊ लागले. आणि विद्यार्थ्यांना उद्योजकशीलतेकडे वळा असा संदेश देऊ लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ते सर म्हणून प्रसिद्ध झाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.