पूजा राठोडचा गर्भपात ते पूजा चव्हाणची आत्महत्या, यवतमाळ ते पुणे 45 तासांचा घटनाक्रम

यवतमाळमध्ये पूजा अरुण राठोड (Pooja Arun Rathod) या तरुणीचा गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पूजा राठोडचा गर्भपात ते पूजा चव्हाणची आत्महत्या, यवतमाळ ते पुणे 45 तासांचा घटनाक्रम
Pooja Chavan_Pooja Arun Rathod_Yavatmal
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 6:06 PM

यवतमाळ/मुंबई : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्याप्रकरणातील गुंता सुटण्याऐवजी वाढत चालला आहे. कारण यवतमाळमधील वैद्यकीय महाविद्यालयात पूजा अरुण राठोड (Pooja Arun Rathod) या तरुणीचं अबॉर्शन अर्थात गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मेडिकल रिपोर्टमध्ये पूजा अरुण राठोड असं नाव आहे, मात्र हीच पूजा लहू चव्हाण आहे का हे अधिकृत स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहितींचा घटनाक्रम आता पुढे येत आहे. यातील पूजा आणि अरुण ही तीच नावं आहेत, ज्यांचा या आत्महत्याप्रकरणात थेट संबंध आहे. (Who is Pooja Arun Rathod Chronology of Pooja Chavan suicide case Maharashtra Yavatmal medical collage)

विशेष म्हणजे पूजा अरुण राठोडचा गर्भपात ते पूजा लहू चव्हाणची आत्महत्या या दोन्ही घटनांमध्ये जवळपास 45 तासांचं अंतर आहे. डॉक्टर दप्तरी नोंदीनुसार पूजा अरुण राठोडला 6 फेब्रुवारीला पहाटे 4 वाजून 34 मिनिटांनी अॅडमिट केलं होतं. पूजा वॉर्ड क्रमांक 3 मध्ये भरती होती. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गर्भपात करण्यासाठी पूजा दाखल झाली होती. तिथे पूजा अरुण राठोड असं नाव नोंदवण्यात आलं.

दुसरीकडे पुण्यात पूजा लहू चव्हाण या परळीच्या तरुणीने 7 फेब्रुवारीला मध्यरात्री दीडच्या सुमारास आत्महत्या केली. आता पूजा अरुण राठोड आणि पूजा लहू चव्हाण एकच आहेत का? एकच असेल तर गर्भपातानंतर पूजाने पुण्यात येऊन आत्महत्या केली का? ऑडिओ क्लिपमध्ये अरुण राठोडने कथित मंत्र्यांशी बोलताना पूजा आत्महत्या करण्यावर ठाम असल्याचा उल्लेख केला होता, तो याच पूजाबाबत आहे का? असे प्रश्न आहेत.

पूजा राठोड गर्भपात ते पूजा चव्हाण आत्महत्या घटनाक्रम

– पूजा अरुण राठोड 6 फेब्रुवारीला पहाटे 4 वाजून 34 मिनिटांनी रुग्णालयात दाखल झाली – यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात पूजा अरुण राठोड या तरुणीचं अबॉर्शन अर्थात गर्भपात झालं

-मेडिकल रिपोर्टमध्ये पूजा राठोडचा जो पत्ता आहे, त्यामध्ये शिवाजीनगर नांदेड, इतकाच उल्लेख आहे. – इकडे 7 फेब्रुवारीला रात्री दीड वाजता पुण्यात पूजा लहू चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली

– पूजा अरुण राठोड या तरुणीचं वय 22 वर्षेच आहे, तर पूजा लहू चव्हाण हिचं वयही 22 वर्षेच होतं. – गुगल मॅपनुसार यवतमाळ ते पुणे 573 किलोमीटर अंतर आहे. – अंदाजे हे अंतर पार करण्यासाठी सुमारे साडेबारा तासांचा रस्ते प्रवास करावा लागतो – पूजा राठोडला रुग्णालयातून डिस्चार्ज कधी मिळाला? – जर पूजा राठोड हीच पूजा चव्हाण असेल, तर गर्भपातानंतर तिने लगेचच प्रवास सुरु केला का? – 6 तारखेला गर्भपात झाल्यानंतर, पूजा पुण्यात नेमकी कधी पोहोचली?

हे सर्व प्रश्न तिथेच येतात, पूजा राठोड आणि पूजा चव्हाण एकच आहेत का? अरुण राठोड कोण आहे?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण काय?

मूळ परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात रहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने रितसर तक्रार दाखल केली. इतकंच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून, चौकशीची मागणी केली. इतकं सगळं होत असताना, पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांची ऑडिओ क्लिप समोर आली. एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिपमुळे चक्रव्यूहात सापडलेले मंत्री संजय राठोड यांचं नावही उघड झाले.

पोस्टमार्टम अहवाल काय म्हणतो?

पोलिसांच्या पंचनाम्यानुसार पूजाने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. तर पूजाच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी पंचनाम्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पूजाने आत्महत्या केल्याचं म्हटलेलं नाही.

संबंधित बातम्या 

मोठी बातमी : श्रीमती पूजा अरुण राठोडचा यवतमाळमध्ये गर्भपात!  

‘नो वन किल्ड जेसिका’ सारखी पूजा चव्हाण प्रकरणाची गत होईल, राज्य सरकारच्या भूमिकेवर फडणवीसांकडून प्रश्नचिन्ह 

(Who is Pooja Arun Rathod Chronology of Pooja Chavhan suicide case Maharashtra Yavatmal medical collage)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.