महाराष्ट्रातील उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? शिंदे की फडणवीस? संजय राऊत यांचं कुणाकडे बोट?

अनेकदा महाराष्ट्रातील उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण ? असा सवाल अनेक राजकारण्यांना विचारला जातो. असाच सवाल संजय राऊत यांना विचारण्यात आला होता, त्यावेळी त्यांनी क्षणाचीही विचार न करता उत्तर दिले आहे.

महाराष्ट्रातील उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? शिंदे की फडणवीस? संजय राऊत यांचं कुणाकडे बोट?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 1:43 PM

मुंबई : शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यावर मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा सुरू असतांना देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले जात होते. मात्र, अखेरच्या क्षणी मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आणि ती घोषणा स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यामुळे संपूर्ण भाजपच्या गोटात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ स्वतः देवेंद्र फडणवी यांनी घेतली होती. मात्र, त्या आधी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री राहिलेले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून कोण उत्कृष्ट अशी तुलना दबक्या आवाजात केली जात आहे.

राज्यातील सर्वात उत्तम काम करणारे मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारला जात असतांना टीव्ही 9 च्या मुलाखतीत संजय राऊत यांना दोन फोटो दाखवून काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण असा सवाल विचारला गेला होता.

त्यामध्ये सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक फोटो होता. आणि दूसरा फोटो माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो होता. त्यावेळी संजय राऊत यांनी एका क्षणाची विलंब न करता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखविला आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातील तरुण मुख्यमंत्री होण्यापैकी एक मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे. संपूर्ण पाच वर्षाचा कालावधी करणारे मुख्यमंत्री म्हणूनही देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे. विविध निर्णयांनी देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द आजही चर्चेत असते.

दरम्यान, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना संजय राऊत यांनी अनेकदा उद्धव ठाकरे यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यामध्ये सर्वात चांगले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी काम केल्याचे संजय राऊत यांनी म्हंटलं होतं. जाहीर व्यसपीठावरही संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

कोरोना काळात महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतांना त्याची दखल जगाने घेतलीय, उत्तम प्रकारे काम केले आहे म्हणून महाराष्ट्र कोरोनातून बाहेर पडला असेही संजय राऊत अनेकदा म्हणाले आहे. त्यानंतर मात्र संजय राऊत यांची पसंती देवेंद्र फडणवीस यांना दिसून येत आहे.

संजय राऊत हे खरंतर भाजपसोबतची युती तुटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतांना अचानक उत्कृष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवल्याने देशासह राज्यात राजकीय चर्चा रंगणार हे मात्र तितकेच खरं आहे.

Non Stop LIVE Update
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ.
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.