सरपंच ते खासदार…; संर्घषाच्या काळात काँग्रेसला ‘अच्छे दिन’ आणणाऱ्या वसंत चव्हाणांचा राजकीय प्रवास

Nanded MP Vasant Chavan Political Career : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय. हैदराबादमधील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वसंत चव्हाण यांचा राजकीय प्रवास तुम्हाला माहिती आहे का? वाचा सविस्तर...

सरपंच ते खासदार...; संर्घषाच्या काळात काँग्रेसला 'अच्छे दिन' आणणाऱ्या वसंत चव्हाणांचा राजकीय प्रवास
वसंत चव्हाणImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Aug 26, 2024 | 10:13 AM

संघर्षाच्या काळात काँग्रेस पक्षासाठी ताकदीने लढणारे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते, नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन झालं. हैदराबादमधील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 64 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वसंतराव चव्हाण यांनी कठीण काळात पक्षाला पुन्हा उभारी दिली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर नांदेड काँग्रेसमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता कमी करून पक्ष पुन्हा बळकट करण्यात त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघात त्यांनी काँग्रेसला विजय मिळवून दिला.

वसंत चव्हाण यांचा राजकीय प्रवास

वसंतराव चव्हाण यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात त्यांच्या गावातून झाली. 1978 साली नायगाव या त्यांच्या मूळगावचे ते सरपंच झाले. तिथून त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. त्यानंतर 2002 ला जिल्हा परिषदेवर ते निवडून आले. त्याच काळात त्यांना विधानपरिषदेवर आमदार होण्याची संधी चालून आली. पुढे 16 वर्षे ते विधान परिषद आणि विधानसभेचे सदस्य राहिले. राष्ट्रवादीकडून ते विधानपरिषदेवर पहिल्यांदा निवडून गेले.

2009 ला अपक्ष निवडणूक लढवत नायगाव मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. 2009 त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 2014 मध्ये पुन्हा एकदा त्यांची विधानसभेवर निवड झाली. 2019 च्या निवडणुकीत मात्र त्याचा पराभव झाला. अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख मात्र अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतरही ते काँग्रेसमध्ये राहिले. लोकसभेची निवडणूक लढवली अन् खासदार झाले.

विजय वडेट्टीवार यांच्याकडून आदरांजली

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वसंत चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहून त्यांनी कठीण काळात काँग्रेस पक्षाला साथ दिली आणि नांदेड जिल्ह्यात पक्ष संघटना टिकवून ठेवली होती. काँग्रेस पक्ष हेच आपले कुटुंब आहे या भावनेने ते आयुष्यभर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. काँग्रेस विचारांचा सच्चा पाईक असणाऱ्या वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली आहे. वसंतरावजी चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कठीण प्रसंगी चव्हाण कुटुंबाच्या आणि मित्र परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत, असं ट्विट वडेट्टीवार यांनी केलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.