कोण आहेत विशाल पाटील ? सांगलीतील कुस्तीत खरा महाराष्ट्र केसरी ठरला हा गडी
सांगलीतून कॉंग्रेसचे अपक्ष उमेदवार विशाल पवार निवडून आल्यानंतर ठाकरे गटाने आघाडीचा नियम पाळला गेला की नाही याची चौकशी होईल असे म्हटले होते. आता कॉंग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी काल विशाल पवार हे तांत्रिकदृष्ट्या अपक्ष असल्याचे म्हटले होते. आता ते ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीची जागा विशाल पाटील यांनी अपक्ष लढून जिंकली आहे. या मतदार संघातून उद्धव ठाकरे गटाने दोन वेळा महाराष्ट्र केसरी झालेल्या पहिलवान चंद्रहार पाटील यांना तिकीट आधीच जाहीर करुन कॉंग्रेसचा गड असलेल्या सांगलीत ट्वीस्ट निर्माण केले होते. कॉंग्रेसचे विशाल पाटील या मतदार संघात लढायची तयारी करीत दोन वर्षांपासून करत होते. आता भाजपाच्या संजयकाका पाटील यांना हरवून ठाकरे यांना पुरुन उरलेला हा विशाल पाटील हा रांगडा गडी कोण ? असा सवाल तुमच्या मनात आला असेल तर पाहूयात विशाल पाटील नेमके आहेत तरी कोण ?
महाविकास आघाडीत सांगली मतदार संघात कॉंग्रेसची ताकद पूर्वी पासून आहे. या मतदार संघात शिवसेनेने सुरुवातीलाच डबल महाराष्ट्र केसरी विजेचे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करुन सर्वांना धक्का दिला होता. आता त्यामुळे कॉंग्रेसचे विशाल पाटील यांच्या मेहनतीवर चांगलेच पाणी फेरले होते. त्यामुळे अखेर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे या सांगली मतदार संघात तीन पाटील एकाच वेळी एकमेकांविरोधात ठाकले गेले. भाजपाचे संजयकाका पाटील, ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील अशी ही निवडणूक तिरंगी झाली होती. परंतू हे विशाल पाटील नेमके कोण आहेते जे ठाकरे यांनाही न जुमानता निवडून आले ते पाहूयात…
कोणाला किती मते मिळाली
सांगली मतदार संघात शिवसेनेने ( ठाकरे ) मार्ग काढावा, सांगली हा माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या विचाराचा वारसा चालविणारा मतदार संघ आहे. त्यामुळे आपण माघार घेणार नसल्याचे त्यावेळी विश्वजीत कदम यांनी जाहीर केले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत या उमेदवारीवरुन ठाकरे आणि कॉंग्रसचे नेते यांच्यात वाद निर्माण झाला होता. यानंतर आघाडीचा धर्म पाळला गेला नाही अशी टीका ठाकरे गटाने केली. येथील तिरंगी लढतीत विशाल प्रकाशबापू पाटील अपक्ष म्हणून 5 लाख 71 हजार 666 मतांनी विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे संजयकाका पाटील यांना 4,71 हजार 613 मते मिळाली. तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार सुभाष पाटील तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले त्यांना 60, 860 मते मिळाली आहेत.
कोण आहेत विशाल पाटील
सांगलीत यंदा काटे की टक्कर पहायला मिळाली. या ठिकाणी तीन पाटील एकमेकांविरोधात दंड ठोकून उभे होते. हा मतदार संघ महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडे गेल्याने येथून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा प्रचार कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केला. तर कॉंग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज भरल्याने या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर अपक्ष विशाल पाटीलच निवडून आले. त्यांच्यावर कारवाई न करण्याचा निर्णयही कॉंग्रेसच्या नेत्यांनी मध्यंतरी घेतला. महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहीलेले वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील नातू विशाल पाटील हे सहावे खासदार ठरले आहेत. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हेच अखेर निवडून आले आहेत. या निमित्ताने कॉंग्रेसचे कदम, वसंतदादा आणि मदनभाऊ गट एकत्र आले. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी देखील विशाल पाटील यांचे मतभेद आहेत.
कॉंग्रेसचा बालेकिल्ला परत मिळविला
सांगली लोकसभा मतदार संघात दोन पोटनिवडणूकांसहा एकूण 19 निवडणूका झाल्या आहेत. त्यातील 1957 निवडणूक शेकापने जिंकली. 2014 आणि 2019ची भाजपाच्या संजय पाटील यांनी जिंकली तर इतर सर्व निवडणूकांत कॉंग्रेसचा विजय झाला आहे. त्यातील पाच निवडणूका वसंतदादा पाटील यांच्या सहकाऱ्यांनी जिंकल्या आहेत. 1980 मध्ये स्वत: वसंतदादा पाटील यांनी इंदिरा गांधी यांच्या आग्रहाने स्वत: निवडणूक लढविली. त्यानंतर सलग दहा निवडूका वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील सदस्यांनी लढविल्या आणि जिंकल्या देखील आहेत. परंतू मोदी लाटेत हा मतदार संघ ( 2014 आणि 2019 ) भाजपा्चे संजयकाका पाटील यांनी जिंकत ताब्यात घेतला होता. तो अपक्ष म्हणून का होईना कॉंग्रेसच्या विशाल पाटील यांनी परत मिळविला आहे.