Sanjay Raut: सर्व एसटी कर्मचाऱ्यांकडे एकाचवेळी प्लॅटफॉर्म तिकीट कुठून आले?, यामागे कोणती यंत्रणा आहे?; राऊतांचा सवाल

| Updated on: Apr 09, 2022 | 11:52 AM

sanjay raut: आता जे आंदोलक आझाद मैदानातून रेल्वे स्थानकावर बसले आहेत. या सर्वांकडे एकाच वेळी प्लॅटफॉर्म तिकीट कसे असू शकते? कोणती यंत्रणा आहे ही? कोणती यंत्रणा काम करत आहे. कोणता राजकीय पक्ष त्यांना पोसत आहे?

Sanjay Raut: सर्व एसटी कर्मचाऱ्यांकडे एकाचवेळी प्लॅटफॉर्म तिकीट कुठून आले?, यामागे कोणती यंत्रणा आहे?; राऊतांचा सवाल
सर्व एसटी कर्मचाऱ्यांकडे एकाचवेळी प्लॅटफॉर्म तिकीट कुठून आले?, यामागे कोणती यंत्रणा आहे?; राऊतांचा सवाल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: आता जे आंदोलक आझाद मैदानातून रेल्वे स्थानकावर बसले आहेत. या सर्वांकडे एकाच वेळी प्लॅटफॉर्म तिकीट कसे असू शकते? कोणती यंत्रणा आहे ही? कोणती यंत्रणा काम करत आहे. कोणता राजकीय पक्ष त्यांना पोसत आहे?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे. कामगाारांबाबत आम्हाला सहानभूती आहे. कामगारांच्या रक्ताततून श्रमातून शिवसेना (shivsena) तयार झाली, महाराष्ट्र तयार झाला. पण कामगारांचा एक गट भडकवून सरकार विरोध महाराष्ट्रा विरुद्ध जी काही गरळ ओकण्याचा हल्ले करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे विरोधकांना वाटत असेल तिरंदाजी मारत आहेत तर ते भ्रमात आहेत, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला. संजय राऊत यांनी शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेऊन कालच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला.

एक मात्र नक्की, काल जो प्रकार घडला ते आंदोलन नव्हतं, तो हल्ला होता. हल्ला करण्याच्या उद्देशाने कुणाच्यातरी पासून प्रेरणा घेऊन त्यांनी हे केलं, त्यांनी कामगार चळवळीचं नाव बदनाम केलं. इंटेलिजन्स फेल्युअर हा घोळ आहे, हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. ते सरकार पाहील. मात्र कामगारांनी आणि त्यांच्या नेत्यांनी प्रमुख नेत्यावर हल्ला करुन गुन्हा केला, असा दावा संजय राऊत यांनी केला.

सदावर्ते वकील नाही, विरोधकांचा गुंड

गुणरत्न सदावर्ते हा नेता वा वकील नाही. तो विरोधी पक्षाने पोसलेला गुंडच आहे. सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं काम सुरू आहे. जंग जंग पछाडत आहेत. त्यातून त्यांना राष्ट्रपती राजवटीची स्वप्न पडताहेत, आणा ना आणून दाखवा, असं आव्हानच राऊत यांनी दिलं.

कर नाही त्याला डर कशाला?

यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही प्रतिक्रिया दिली. माझ्या माहितीप्रमाणे ते पोलीस स्टेशनला गेलेले नाहीत, ते भूमिगत आहेत. फरार आहेत, असं मला सांगण्यात आलंय. ते अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात पोहचलेत. कर नाही त्याला डर कशाला? भाजपाच मंत्र आहे ना तो. आमच्याबाबतीत वापरता. तुम्ही लोकांना प्रश्न विचारता, उत्तरं मागता, जबाव दो जबाव दो, आता तुम्हीपण जवाब द्या, मला जी माहिती होती, ती पोलिसांसमोर ठेवली. आता पोलीस काम करतात. केंद्रीय तपास यंत्रणांचे एजंट म्हणून काही लोक काम करतात, आमच्याकडे तशी पद्धत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या:

Ajit Pawar On St: त्याला काहीच अर्थ नाही, भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया अजित पवारांनी उडवून लावल्या

Fadnavis on Pawar: हे भयावह आहे, आधी अजित पवार आणि आता फडणवीस, पोलिसांच्या अपयशावर मोठं प्रश्नचिन्ह, वळसे पाटलांची अडचण वाढतेय?

Sanjay Raut : अँटीसिपेटरी बेल के लिए तो चोर डकैत जाते है, नॉट रिचेबल असलेल्या सोमय्या पिता पुत्रांवर राऊतांची पुन्हा टीका