CM चर्चेतला की नवा चेहरा, निर्मला सितारामन यांचा आतापर्यंतचा रेकॉर्ड काय ?
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडण्याची जबाबदारी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्यावर सोपविण्यात आली आहे. केंद्रातून निरीक्षक म्हणून निर्मला सितारामन आणि विजय रुपाणी मंगळवारी रात्री मुंबईत येते आहेत. सितारामन यांच्यावर तीन वेळा मुख्यमंत्री निवडण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. यावेळी काय होणार याकडे नजर लागली आहे.
महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि विजय रुपाणी यांना केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.निरीक्षकांचे काम विधीमंडळ पक्षाची बैठक घेणे आणि नवीन मुख्यमंत्र्याची निवड करणे या घडामोडीत महत्वाची भूमिका बजावत असतात. गेल्या सात वर्षांत चौथ्यांदा निर्मला सितारामन या निरीक्षक म्हणून मुख्यमंत्री निवड करण्यासाठी जात आहेत. या पूर्वी सितारामन साल २०१७ मध्ये हिमाचल, २०१९ मध्ये हरियाणा आणि २०२२ मध्ये मणिपूरमध्ये केंद्रीय निरीक्षक म्हणून मुख्यमंत्र्याची निवड केलेली आहे.
कोणता फॉर्म्युला असणार ?
महाराष्ट्र निवडणूकांचा निकालानंतर अकरा दिवसांना सितारामन मुख्यमंत्री निव़डीसाठी मुंबईत मंगळवारी रात्री येणार आहेत. निर्मला सितारामन यांच्या सहकार्यासाठी भाजपाने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना पाठवणार आहेत. विजय रुपाणी यांच्यामते मुख्यमंत्री भाजपाचा असणार आहे. महाराष्ट्रात महायुती आधी अडीच वर्षे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संधी मिळालेली आहेय आता विधानसभेच्या निवडणूका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविलेली असल्याने एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री पद देण्यात यावे अशी मागणी शिंदे समर्थक शिवसैनिक करीत आहेत. असेही असले तरी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री निवड पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह करतील असे म्हटले आहे.त्यामुळे दिल्ली ते मुंबई अशा प्रकारचे दौरे होत आहेत. त्यामुळे निर्मला सितारामन अखेर कोणता फॉर्म्युल्यानुसार मुख्यमंत्री निवड करणार याकडे लक्ष लागले आहे.
तीन पैकी दोन चेहरे रिपीट,एकदा सरप्राईज
निर्मला सितारमन आतापर्यंत तीन वेळा विविध राज्यात निरीक्षक म्हणून निवड करण्यासाठी जात आहेत. साल २०१७ मध्ये हिमाचल प्रदेशातील निवडणूकानंतर विधीमंडळाच्या बैठकीत जयराम ठाकूर यांची विधीमंडळ नेते पदी निवड झाली होती. त्यावेळी जे.पी.नड्डा आणि प्रेम धुमल हे मुख्यमंत्री पदाचे मोठे दावेदार होते. मुख्यमंत्रीच्या रुपाने जयराम ठाकूर यांची एण्ट्री सरप्राईजिंग होती.
२०१९ मध्ये हरियाणा येथे निर्मला सितारामन निरीक्षक म्हणून गेल्या तेव्हा विधीमंडळाच्या बैठकीत मनोहर लाल खट्टर यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली गेली.खट्टर आधी देखील मुख्यमंत्री होते. २०२२ मध्ये भाजपाला मणिपूरमध्ये पुन्हा विजय मिळाला. निर्मला सितारामन यांना निरीक्षक म्हणून पाठविण्यात आले तेव्हा निर्मला सितारामन यांनी एन.विरेन सिंह यांच्या नावावर सहमती झाली. एन.विरेन सिंहच त्यावेळी मुख्यमंत्री होते.
चेहरा रिपीट होणार का? सरप्राईज मिळणार ?
निर्मला सितारामन यांचा निरीक्षक म्हणून पाठविण्याचा आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहाता तीन पैकी दोन वेळा जो चेहरा चर्चेत होता. त्याच्याच गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली.अशात म्हटले जात आहे की महाराष्ट्रात देखील चर्चेतील चेहऱ्यालाच मुख्यमंत्री केले जाईल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदासाठी भाजपाचे सर्वात मोठे दावेदार आहेत. फडणवीस २०१४ ते २०१९ पर्यंत ते मुख्यमंत्री होते. त्यांना महायुतीचे नेते म्हटले जाते. एकनाथ शिंदे आणि अजितदादांना भाजपात आणण्यात त्यांचा मोठा रोल होता. सरकार स्थापनेसाठी दिल्ली ते मुंबई एनडीएच्या जितक्या बैठका झाल्या आहेत. सर्व बैठकात देवेंद्र फडणवीस सामील होते. त्यामुळे त्याची बाजू वरचढ आहे.
महाराष्ट्रात तिसऱ्यांदा भाजपाचा मुख्यमंत्री
२०१४ मध्ये प्रथम भाजपाने महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना प्रथम मुखमंत्री केले होते. ते २०१४ ते २०१९ पर्यंत मुख्यमंत्री होते. नंतर साल २०१९ मध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष झाला. भाजपाने सरकार स्थापन करायला निघाले.फडणवीस यांनी शपथही घेतली पण विश्वास ठराव जिंकू शकले नाहीत. आता तिसऱ्यांदा भाजपा महाराष्ट्रात आपला मुख्यमंत्री बनवत आहे. १९९५ मध्ये प्रथम भाजपा आणि शिवसेना युती प्रथमच महाराष्ट्रात सत्तेत आली होती. त्यावेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भाजपाचा उपमुख्यमंत्री बनला. २८८ जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत भाजपाला यंदा १३२ जागांवर विजय मिळाला आहे. त्यांचे सहकाही एकनाथ शिंदे यांना ५७ तर अजित पवार यांना ४१ जागांवर विजय मिळाला आहे.