देवेंद्र फडणवीस आणि जरांगे पाटील यांच्यात भिंत कुणाची? ‘त्या’ विधानावरून दावे प्रतिदावे काय?

जरांगे पाटील यांच्या आरोपांवरून महाराष्ट्रात पुन्हा तणाव निर्माण झालाय. मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, भाजप नेत्यांनी सागर बंगल्यावर जाण्यासाठी आधी आमची भिंत पार करावी लागेल असा इशारा दिलाय. यातच आता ब्राह्मण आणि मराठा असा नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

देवेंद्र फडणवीस आणि जरांगे पाटील यांच्यात भिंत कुणाची? 'त्या' विधानावरून दावे प्रतिदावे काय?
DEVENDRA FADNAVISImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Feb 25, 2024 | 4:52 PM

मुंबई | 25 फेब्रुवारी 2024 : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा आरोप केलाय. मला संपविण्याचा डाव आहे. सलाईनमधून माझ्यावर विष प्रयोग करण्याचा प्रयत्न आहे. त्यांचा बामणी कावा आता चालणार नाही. मला संपवायचे असेल तर मीच सागर बंगल्यावर येतो. मला मारून टाका असे आव्हानही जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना दिलं. जरांगे पाटील यांच्या आरोपांवरून महाराष्ट्रात पुन्हा तणाव निर्माण झालाय. मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे भाजप नेत्यांनी सागर बंगल्यावर जाण्यासाठी आधी आमची भिंत पार करावी लागेल असा इशारा दिलाय. यातच आता ब्राह्मण आणि मराठा असा नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर येण्याचा इशारा दिला. त्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनीही जरांगे पाटील यांना आव्हान दिलंय. आंदोलन नेमकं कशासाठी आहे? मराठा समाजासाठी आहे की फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी आहे? या संपूर्ण प्रकरणाची स्क्रिप्ट नेमकी कुठून येते? या निमित्ताने फडणीसांना टार्गेट करण्याचं काम केलं जातंय. त्यामुळे सागर बंगल्याबाहेर आम्हीदेखील आहोत. आमची एक भिंत असेल. त्यामुळे जरांगेंनी त्याचा विचार करावा. पहिल्यांदा आमची भिंत पार करा आणि नंतरच सागर बंगल्यावर पोहोचा, असा इशारा नितेश राणे यांनी दिलाय.

भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही ‘जरांगे पाटील आता हे दुकान बंद करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मागे शरद पवार आहेत की जालन्यातील भैय्या कुटूंब हे सुद्धा त्यांनी सांगावे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे. नोकरीत आणि शिक्षणात आरक्षण आहे त्यामुळे तुमच्या ॲडव्हाइसची समाजाला आता गरज नाही असा टोला लगावला.

देवेंद्र फडणवीस यांचा बामणी म्हणून उल्लेख केल्यामुळे पुण्यातील हिंदू महासभाही आक्रमक झालीय. हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी जरांगे विकृत होत चालले आहेत अशी टीका केलीय. शेवटी! देवेंद्र यांची जात आठवलीच ना मनोज जी असा टोलाही त्यांनी लगावला. फसवं का असेना? पण, मराठा समाजाला पहिलं आरक्षण त्यांनीच दिले. याच ब्राह्मण उपमुख्यमंत्री असलेल्या सरकारकडे तुम्ही मागण्या करत होतात आणि करत आहात. आज तुम्ही बदलले. मुस्लिम आरक्षणाची मागणी करताना तुम्हाला ब्राह्मण मात्र नकोय. लोकांना फसवणं बंद करा, अशी टीका आनंद दावे यांनी केलीय.

देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने आमदार आणि हिंदू महासंघ उभा राहिला. तर इकडे संभाजी ब्रिगेडने मनोज जरांगे पाटील यांची बाजू घेतलीय. मराठा आरक्षण आंदोलन हाणून पाडण्याचे सरकारचे षडयंत्र आहे. आरक्षण द्यायचंच नाही हा बामणी कावा आज मनोज जरांगेंच्या माध्यमातून महाराष्ट्रात समोर जाहीर झाला असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता संतोष शिंदे म्हणाले.

मराठा समाज सरकारकडे ओबीसीतून आरक्षण मागत आहे. सरकारकडे धनगर समाज एसटीतून आरक्षण मागत आहे. याला छेद देण्याचं काम, टोलवाटोलवी करण्याचं काम किंवा बदनाम करण्याचं काम सरकारकडून, शिंदे-फडणवीस-पवार कडून होत आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात असेच वाद लावून आरक्षण आंदोलकांना बदनाम करण्याचं काम सरकारकडून होत आहे, अशी खरमरीत टीका त्यांनी केलीय.

काही गद्दार मंडळी सरकारच्या भूलथापांना बळी पडून आरोप करत आहेत हे दुर्दैवी आहे. दहा टक्के आरक्षण ही तात्पुरती तडजोड आहे. पंतांचा हा डाव आहे. आरक्षण मिळू नये हे षडयंत्र आहे हे आज परत स्पष्ट झाले. फडणवीस साहेबांसोबतचे मराठे, भाजपमधील मराठे हे गप्प का आहेत असा सवालही संभाजी बिग्रेडने केलाय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.