Sangli Family Suicide: सांगलीतल्या त्या एकाच कुटूंबातल्या 9 जणांनी आत्महत्या का केली? गुढ उकलणारी चि्ट्टी पोलीसांच्या हाती

डॉक्टर माणिक वनमोरे दाम्पत्याचा घरात सहा मृतदेह तर दुसऱ्या शिक्षकाच्या घरात तीन मृतदेह सापडले आहेत. त्या सामूहिक आत्महत्येचा घटनेने संपूर्ण जिल्हा आणि मिरज तालुका हादरून गेला आहे.

Sangli Family Suicide: सांगलीतल्या त्या एकाच कुटूंबातल्या 9 जणांनी आत्महत्या का केली? गुढ उकलणारी चि्ट्टी पोलीसांच्या हाती
सांगलीत एकाच कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 8:53 PM

सांगली: सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळमधील (Mhaisal, Miraj) दोन कुटुंबातल्या 9 जणांच्या मृत्यूचा प्रकार (Death of 9 people) घडला आहे. मात्र नेमके कोणत्या कारणातून हा मृत्यू झाला आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. विषबाधेतून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी नेमके या 9 जणांच्या मृत्यूचे कारण तपासानंतर समोर येईल असे पोलिसांकडून (Sangli Police) सांगण्यात आले आहे. या घटनेने मात्र सांगली जिल्हा हादरुन गेला आहे.

मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे दोन सख्खे भाऊ एक शिक्षक आहे आणि दुसरा पशूवैद्यकीय डॉक्टर. या दोन्ही दाम्पत्याच्या घरातील एकाच वेळी नऊ जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली.

 मिरज तालुका हादरला

डॉक्टर माणिक वनमोरे दाम्पत्याचा घरात सहा मृतदेह तर दुसऱ्या शिक्षकाच्या घरात तीन मृतदेह सापडले आहेत. त्या सामूहिक आत्महत्येचा घटनेने संपूर्ण जिल्हा आणि मिरज तालुका हादरून गेला आहे. घटनास्थळी पोलीस पंचनामा सुरू असून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

नऊ जणांचा समावेश

या आत्महत्या केलेल्या घटनेमध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय 52), संगीता पोपट वनमोरे (48), अर्चना पोपट वनमोरे (30), शुभम पोपट वनमोरे (28), माणिक यल्लाप्पा वनमोरे (49), रेखा माणिक वनमोरे (45), आदित्य माणिक वन (15) अनिता माणिक वनमोरे (28) आणि अक्काताई वनमोरे (72) या नऊ जणांचा त्यामध्ये समावेश आहे.

उशिरापर्यंत दरवाजा उघडलाच नाही

म्हैसाळ येथील नरवाड रोड जवळ असलेल्या अंबिकानगर चौडाच मळ्यात डॉक्टर माणिक वनमोरे कुटुंबासह राहत होते. तर दुसरा भाऊ शिक्षक पोपट वनमोरे राजधानी कॉर्नर सुतार मळा येथे दुसऱ्या घरात राहत होते. सोमवारी सकाळपासून दोन्ही घरांचा दरवाजा उघडला नव्हता. त्यामुळे आसपास राहणाऱ्या शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता एकाच घरात सहा जणांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. त्यानंतर दुसऱ्या घरात तिघांचे मृतदेह मिळून आले. एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय

याबाबत येथील रहिवाशांनी पोलिसांना सांगितले की, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, पोलीस उपाधीक्षक अशोक विरकर, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्यासह मिरजगाव पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेमुळे मिरज तालुका हादरून गेला असून म्हैसाळ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.